सिनेनामा 

‘वास्तविक जीवनाचा सामना करण्यास मदत करण्यासाठी आपण भयपट निर्माण करतो…’

rudhirvanas-actress-paavana-talked-to-media

इफ्फीत सिनेप्रेमींना आगामी कन्नड भयपट रुधीरवनची एक रोमांचक झलक दाखवण्यात आली. दिग्दर्शक अग्नि आणि मुख्य अभिनेत्री पावना गौडा यांनी आज महोत्सवातील पत्रकार परिषदेला संबोधित केले.

दिग्दर्शक अग्नि यांनी सांगितले की यापूर्वी अनेक चित्रपट प्रकल्पांमध्ये काम केले असले तरी रुधीरवन या चित्रपटाद्वारे आपण दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहोत. भयपट दिग्दर्शित करण्याच्या अनुभव विशद करताना ते म्हणाले की या शैलीसाठी वेगळ्या मानसिकतेची आवश्यकता असते. जंगले, दुर्गम भाग आणि इतर आव्हानात्मक ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी मजबूत मानसिक एकाग्रता आणि लवचिकता आवश्यक असते, असे त्यांनी नमूद केले.

आपल्या भयपटाच्या व्यावसायिक व्यवहार्यतेबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले की मर्यादित संसाधनांमध्येही भयपट शैली व्यवस्थापित केली आहे. “जवळजवळ 40 टक्के चित्रपटाचे चित्रीकरण घरामध्ये करण्यात आले आहे, यामुळे आम्हाला प्रकाशयोजना नियंत्रित करता आली आणि आवश्यकतेनुसार अनेक दृश्ये घेता आली. लहान क्रू आणि अनुकूल परिस्थितीमुळे भयपट एक व्यावहारिक आणि व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य शैली बनते,” असे त्यांनी स्पष्ट केले.

इफ्फीमध्ये येण्याबद्दलचा उत्साह व्यक्त करताना ते म्हणाले, “मला नेहमीच इथे येण्याची उत्सुकता होती. मी एके दिवशी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याची योजना आखली होती आणि आज मी माझ्या पहिल्याच दिग्दर्शित चित्रपट ‘रुधिरवन’साठी पत्रकारांना संबोधित करत आहे. मी आत खोलवर उत्साहाने थरथर कापत आहे.” त्यांनी इफ्फीचे वर्णन असे केले की ते सीमांशिवाय सिनेमा साजरा करते. “येथे तुम्ही जगभरातील चित्रपट कोणताही भेदभाव न करता पाहता; मग व्यावसायिक, कलात्मक किंवा माहितीपट असो. इफ्फी असे चित्रपट दाखवते जे इतरत्र कुठेही सहज उपलब्ध होत नाहीत, अगदी ऑनलाइन देखील नाहीत. मला सिनेमा खरोखरच आकर्षित करतो,” असे ते पुढे म्हणाले.

आपला दृष्टिकोन मांडताना अभिनेत्री पावना गौडा म्हणाली, “वास्तविक जीवनाशी जुळवून घेण्यासाठी भयपट निर्माण केला जातो असे म्हटले जाते आणि रुधिरवन त्या कल्पनेवर खरा राहतो.” तिने नमूद केले की भयटात काम करणे हे इतर शैलींमध्ये काम करण्यापेक्षा खूप वेगळे आहे. “भयपट शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कठीण असतो, परंतु प्रकल्पाची वचनबद्धता आणि काहीतरी नवीन साध्य करण्याची तयारी ही अभिनेत्याला प्रेरित करते,” ती म्हणाली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!