स्व. संजीव वेरेंकार काव्यलेखन स्पर्धेत उदय गुडे यांना प्रथम पारितोषिक
पणजी:
कोंकणीतील नामवंत कवी स्व. संजीव वेरेंकार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घेतलेल्या तिसऱ्या अखिल भारतीय कोंकणी काव्यलेखन स्पर्धेचे निकाल जाहीर झाले आहेत. स्पर्धेत ५०००/- रुपयांचे पहिले पारितोषिक उदय गुडे (गोवा) यांना, तर ३०००/- रुपयांचे दुसरे पारितोषिक टी. उमेश भट (कोची) यांना मिळाले असून २०००/- रुपयांचे तिसरे पारितोषिक, जितेंद्र फडते (गोवा) यांना प्राप्त झाले आहे. उत्तेजनार्थ बक्षिसे अनुक्रमे सारंग मेळेकर (सांगे) आणि शीतल नंदकुमार परब (पेडणे) यांना मिळाले आहे.
ही स्पर्धा अपूर्व प्रकाशन, मंगेशी यांनी आयोजित केली असून स्पर्धेत एकूण ७५ कवींनी भाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काशिनाथ नाईक व गोपीनाथ गांवस यांनी काम पाहिले.
सर्व विजेत्यांना मार्च २०२६ च्या तिसऱ्या आठवड्यात एका विशेष कार्यक्रमात रोख बक्षिसे, स्मृतिचिन्हे आणि प्रमाणपत्रे दिली जातील. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व कवींना देखील प्रमाणपत्रे देखील दिली जातील असे आयोजकांद्वारे कळविण्यात आले आहे.


