‘दुबार पीक कर्ज घोटाळ्यातील एकाला ही सोडणार नाही’
सातारा (महेश पवार):
सातारा जिल्हा बँक केडर नियंत्रित सचिवांनी मागील 5 ते 7 वर्षात केलेल्या सुमारे एक हजार कोटींच्या दुबारपीककर्ज वाटप व दुबार सबसीडी घोटाळा प्रकरणी कण्हेरखेडचे सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हा उपनिबंधकांसह महाराष्ट्र शासन व केंद्रिय सहकार विभाग, केंद्रीय तपास यंत्रणा यांना पुराव्यासह तक्रारी दिल्या आहेत.
किशोर शिंदे यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत ईडीने सहकार आयुक्त याना काही महत्वपूर्ण विषयांवर चौकशी करण्यासाठी नोटीस दिलीआहे. सहकार आयुक्त यांनी साताऱ्याच्या विवादित जिल्हा उपनिबंधक यांना सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विषयांवर चौकशीचे स्पष्ट लेखी आदेश दिलेले असताना सातारा जिल्हा बँक अध्यक्ष कोणतीही नोटीस नसल्याचे बेजबाबदार विधान माध्यमांसमोर बोलले.
साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक यांनी बँकेला दिलेल्या चौकशी पत्रावर बँकेकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे चौकशी करु न शकल्याचे यंत्रणेला कळवले होते. जिल्हा बँकेच्या सिओ राजेंद्र सरकाळे यांनी जिल्हा बँक प्रशासनाला सदर विषयावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून प्राप्त नोटीस त्याला दिलेले उत्तर माध्यमांना न देता बँकेची भूमिका संशयास्पद असल्याचे अधोरेखित केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री यांना किशोर शिंदे यांनी केलेली तक्रार व दिलेल्या पुराव्यावरून जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांना एकदा सोडुन दोन वेळा फौजदारी कारवाईसह स्पष्ट भूमिका घेण्याची सूचना केलेली असताना जिल्हा उपनिबंधक माळी हे सहकार मंत्री यांचे आदेश पाळत नसल्याचे चित्रं समोर आले. आज सहकारमंत्री अतुल सावे सातारा दौऱ्यावर असताना राष्ट्रमतचे जिल्हा प्रतिनिधी महेश पवार यांनी जिल्हा बँक नियंत्रित केडर सचिवांनी केलेल्या दुबारपिककर्ज घोटाळ्या संदर्भात विचारलं असता , सहकार मंत्री अतुल सावे यांनी 30 दिवसात अहवाल सादर करत कठोर कारवाई घेणार असल्याचे स्पष्ट केले व या प्रकरणी एकालाही सोडणार नसल्याचे आश्वासन सावे यांनी राष्ट्रमत शी बोलताना दिले.
पाहूयात नेमकं काय म्हणाले सहकार मंत्री अतुल सावे….
यामुळे तीस दिवसांनंतर या दुबार पीक कर्ज घोटाळ्यातील कोणाकोणावर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.