‘त्या’ मुलीच्या मामालाही ठोकल्या बेड्या…
कराड (अभयकुमार देशमुख) :
कराड तालुक्यातील स्वतःच्या अल्पवयीन मुलीचा आई- वडिलांनीच खून केल्याची घटना समोर आली होती. आता या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आले असून तिसरा आरोपी अल्पवयीन मुलीचा मामाच असल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणातील आरोपींची संख्या तीन झाली आहे.
याबाबत अधिक माहिते अशी…
कराड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद 17 एप्रिल रोजी कराड पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. मुलगी बेपत्ता झाल्याचे फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिली होती.
त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु असताना मुलीच्या वडिलांकडे पोलिसांनी कसून चाैकशी केली त्यानंतर मुलीच्या वडिलांनी गुन्ह्याची कबुली दिली.
चौकशीत मुलीच्या वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीचे प्रेमप्रकरण असल्यानेच आपल्या मुलीचा खून केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मुलीचे वडिल आणि आईला ताब्यात घेतले होते.
या प्रकरणाचा अधिक तपास केल्यानंतर या खून प्रकरणात मुलीच्या मामाचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या मामालाही ताब्यात घेतले आहे.