google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘परशुरामांच्या प्रेरणेतल्या गोवा व्हिजन 2035 ची कार्यवाही करण्याची गरज’

मडगाव ​:
नामवंत शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील गोवा गोल्डन ज्युबिली काउंसीलने तयार केलेल्या गोवा व्हिजन २०३५ अहवालातील भगवान परशुरामांच्या सात बाणांच्या प्रेरणेतुन अधोरेखीत केलेल्या ७ धोरणांची त्वरीत कार्यवाही करणे ही काळाची गरज आहे असे मडगावचे आमदार व माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.

आज अक्षय तृतीया, इद उल फित्र तसेच परशुराम जयंतीच्या निमीत्ताने गोमंतकीयांना शुभेच्छा देताना दिगंबर कामत यांनी सुरम्य, सुसंस्कृत, संतुलित, सुविद्य, समृद्ध, सुशासीत व स्वानंदी गोवा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.

जगभरात विवीध क्षेत्रात नामना मिळविलेल्या जाणकारांनी तयार केलेल्या गोवा व्हिजन २०३५ च्या मुखपृश्ठावर, कॅनडात स्थायीक झालेले गोमंतकीय चित्रकार मेल डिसोझा यांनी फादर नासिमेंत मास्कारेन्हस यांच्या एका पुस्तकात काढलेले भगवान परशुरामांचे रेखाचित्र असल्याचा दिगंबर कामत यांनी आवर्जुन उल्लेख केला.

गोवा मुक्तीच्या पन्नासाव्या वर्षी गोवा गोल्डन ज्युबिली डेव्हलपमेंट काउंसीलची स्थापना करण्याचे भाग्य मला लाभले. विवीध क्षेत्रातील जाणकारांचा समावेश असलेल्या या मंडळात डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भाटकर, डॉ. अनिल काकोडकर, आर्कीटेक्ट चार्लस कुरैया, प्रो. माधव गाडगीळ, डॉ. लिजीया नोरोन्हा, अशांक देसाई, डॉ. विजय केळकर, प्रो. एरल डिसोझा, प्रो. विठ्ठल सुखटणकर, डॉ. प्रेमानंद रामाणी, प्रो. दिलीप देवबागकर, डॉ. सतीश शेट्ये व राज पारोडा तसेच इतर मान्यवरांचा समावेश होता. गोव्याची परंपरा व आधुनीकता यांचा मेळ घालुन गोव्याच्या विकासाचे धोरण या अहवालात तयार करण्यात आले असे दिगंबर कामत म्हणाले.

गोवा व्हिजन २०३५ अहवालात गोमंतकीयांच्या बहुसांस्कृतिक, शांतताप्रीय तसेच लढवय्या स्वभाव वैशिष्ट्यांचा उल्लेख करण्यात आला असुन, दूरदृष्टीचा विचार करुन या प्रांताच्या भवितव्याचा विचार करण्याचे सामर्थ्य गोमंतकीयांमध्ये असल्याचे या अहवालात अधोरेखीत करण्यात आले आहे असे दिगंबर कामत यांनी नमुद केले.

आपण आता गोवा हे एक आदर्श राज्य करण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. आपली प्राथमिकता व प्राधान्यक्रम ठरवुन योग्य दीशादर्शकाच्या आधारे आता वाटचाल करणे गरजेचे असुन, नाहक वाद उकरुन न काढता, राज्यातील धार्मिक सलोखा, परंपरा व वारसा जपण्यासाठी सगळ्यानी वावरणे गरजेचे आहे असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!