google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

मडगाव येथे कार्निव्हल मिरवणुक उत्साहात

Goa Carnival 2023 पणजी नंतर आज मडगाव शहरात कार्निव्हलची शानदार चित्ररथ मिरवणूक निघाली. विविध संस्थांचे वेगवेगळ्या संकल्पना घेऊन आलेले चित्ररथ आणि वेगवेगळी सोंगे घेऊन या मिरवणुकीत सामील झालेले लोक यामुळें या मिरवणुकीला वेगळेच स्वरूप आले होते.

पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांनी झेंडा दाखवून या मिरवणुकीला सुरुवात केली. यावेळी मडगावचे आमदार दिगंबर कामत, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, नुवेचे आमदार आलेक्स सिकेरा, हळडोना येथील आमदार कार्लोस फेरेरा तसेच माजी आमदार चर्चिल आलेमाव आणि दामू नाईक उपस्थीत होते.

यावेळी ही मिरवणूक (Goa Carnival) रवींद्र मार्गे न काढता होली स्पिरीट चर्च ते नगरपालिका या मार्गाने काढली होती. या मार्गावर लोकांनी दुतर्फा गर्दी केली होती.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!