पणजी :
देशभर गाजत असलेल्या सोनाली फोगाट (Sonali Phogat Death Case) यांच्या मृत्यूप्रकरणी दोन अटक आरोपी यांनी हत्येची कबुली दिली आहे. सोनाली फोगाट यांचा स्वीय सहाय्यक सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांना हणजुणे पोलिसांनी (Anjuna Police) अटक केली आहे. सोनाली फोगाट यांच्यावर हरियाणाच्या हिस्सार (Hissar, Haryana) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
हणजुणे पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेत सोनाली फोगाट प्रकरणाची माहिती दिली. यावेळी पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णाई (IGP Ombir Singh) यांनी असे सांगितले की, हणजुणे येथील कर्लीस बारमध्ये पाण्यात विषारी औषध मिसळून सोनाली यांना दिल्याचा व्हिडिओ पुरावा पोलिसांना मिळाला आहे.
दरम्यान, आरोपींनी सोनाली फोगाट यांना जबरदस्तीने विषारी औषध पाजले, त्यानंतर बेशुद्ध झालेल्या फोगाट यांना तब्बल दोन तास स्वच्छतागृहात सोडण्यात आले. तब्बल दोन सोनाली फोगाट स्वच्छतागृहात तडफडत होत्या, त्यानंतर अर्धमेल्या अवस्थेत त्यांना बाहेर काढण्यात आले. सेंट अँथनी रूग्णालयात त्यांना दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.