
“एक तर फडणवीस राहतील किंवा मी…”
Uddhav Thackeray : शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उबाठा गटाला चांगले यश मिळून दिले. त्यानंतर आता शिवसेना उबाठा गटाकडून विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी आज मुंबईतील शाखाप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला संबोधित करत असताना उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. लोकसभेत आपण असे नडलो की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाम फोडला, असेही विधान उद्धव ठाकरे यांनी केले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आता विधानसभा निवडणुकीत भाजपाची उरली सुरली गुर्मीही उतरवू. सगळं सहन करून मी उभारा राहिलो. यापुढे राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहिल, असेही आव्हान उद्धव ठाकरे यांनी केले.