‘शिवसागर’चा लेक व्यू ठरतोय पर्यावरणाला घातक?
सातारा (महेश पवार) :
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या महाराष्ट्राला वरदानी ठरलेल्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाचा परिसर हा बफर झोन, ग्रीन झोन , कोरझोन, इको सेन्सिटिव्ह असताना देखील कोयना धरणाच्या परिक्षेत्रात महत्तम पूर पातळी मध्ये अतिक्रमण करून अनेक धनदांडग्या नी लेक व्हू परिसरात बेकायदेशीररित्या हॉटेल फार्म हाऊस बांधून सांडपाणी धरण क्षेत्रात सोडल्याने, वृक्षतोड केल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने पर्यावरणास घातक ठरत आहे.
त्याचं बरोबर कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या लेक व्हू परिसरात अनेकांनी हॉटेल थाटून याठिकाणी प्रशासनाच्या नाकावर टिच्चून धरण क्षेत्रात बेकायदेशीर बांधकामे करुन , बोटींग व्यवसाय सुरू केले मात्र कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी नसताना पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार न करता याठिकाणी पर्यटनाच्या नावाखाली बेकायदेशीर बोटींग सुरू आहे . स्कूटर बोट ला परवानगी नसताना देखील याठिकाणी स्कूटर बोटींग देखील सुरू आहे, मात्र हे सगळं होत असताना प्रशासन मुग गिळून गप्प का? असा सवाल उपस्थित होत आहे. याठिकाणी पर्यटनाच्या नावाखाली धांगडधिंगा घालणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून , यामुळे परिसरात अवैध दारू व्यवसायाने डोक वर काढलं असून लेक व्हू परिसरात दारूच्या नशेत धरणाच्या पाण्यात उतरून पोहताना अनेक जन बुडाल्याच्या घटना समोर आल्या आहेत . तरी देखील प्रशासन गंधारीच्या भूमिकेत दिसते, यामुळे कोयना धरणाचा लेक व्हू पर्यटकांना जिवघेणा ठरतोय.
कोयना धरण परिक्षेत्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर हॉटेल आणि रिसॉर्ट चालकांना पोलिस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाचे तसेच महसूल विभागांचे अभय असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावाच्या परिसरात अवैध धंदे जोमाने सुरू कसे काय?असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे .