google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘गोव्यात रेड लाईट एरियाची गरज…’

सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर यांची मागणी

Tara Kerkar Demands Read Light Area in Goa: राज्यातील लैंगिक गुन्ह्यांची संख्या कमी करण्यासाठी गोव्याला ‘बाजार’ (रेड लाईट एरिया) आवश्यक असल्याचे मत, सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर यांनी व्यक्त केले आहे. दक्षिण गोव्यातील एका शाळेतील कथित विनयभंगाच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना केरकर यांनी ही मागणी केली.

त्या म्हणाल्या की, राज्यासाठी रेड लाईट एरिया आवश्यक आहे. ज्यांना स्वतःला संतुष्ट करायचे आहे ते आमच्या मुलींवर हल्ला करण्यापेक्षा तिथे जाऊन स्वतःचे समाधान करू शकतात. गोव्यात आज सर्वकाही आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे.

पण येथे रेड लाईट एरिया नाही. तो नसल्या कारणानेच ही असली डोकी फिरलेली लोकं, नालायक लोकं लहान मुलींचे लैंगिक शोषण करतात. मुलींचे आयुष्य उद्धवस्त करतात. गोव्यात बायना येथे रेड लाईट एरिया होता. पण तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तो बंद केला.

मी तेव्हाच मनोहर पर्रीकर यांना इशारा दिला होता की, तुम्ही हा बाजार उद्धवस्त करत आहात. पण असे पाऊल उचलणे हे भविष्यात त्रासदायक ठरू शकेल. गोव्यात पुढे जाऊन वातावरण तंग होईल, त्याला जबाबदार तुम्ही असाल.

बडे श्रीमंत लोक हॉटेल्समध्ये हे सर्व करत असतातच. रेड लाईट एरिया नसला तरी हे सर्व चालतच असते. पण इतरांसाठी ते सहज सर्वांसाठी उपलब्ध नाही. गावाबाहेर का असेना पण करा. कारण अनेक मुलींचे आयुष्य उद्धवस्त होत आहे, असे त्या म्हणाल्या.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!