ऑफरोड अकादमी व एआर हेल्मेटची टीव्हीएसकडून घोषणा
दुचाकी आणि तीन चाकी वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी टीव्हीएस मोटरने मोटोसोल 5.0च्या दुसऱ्या दिवशी तंत्रज्ञान, सुरक्षा आणि रायडर अनुभव उंचावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. कंपनीने एजिस रायडर व्हिजन एआर एचयूडी हेल्मेट, टीव्हीएस रेसिंग–एमटी हेल्मेट्स भागीदारी, तसेच टीव्हीएस रेसिंग ऑफरोड ट्रेनिंग अकादमी या उपक्रमांचे अनावरण केले.
एजिस रायडर व्हिजन : पुढील पिढीचे एआर एचयूडी हेल्मेट
टीव्हीएसने सादर केलेले नवीन एआर एचयूडी हेल्मेट हे रायडर सुरक्षा व तंत्रज्ञानाच्या दिशेने मोठी झेप मानली जाते.
या हेल्मेटद्वारे
नेव्हिगेशन दिशा,
वेग,
सुरक्षा अलर्ट,
महत्त्वाच्या सूचना
हे सर्व थेट रायडरच्या दृष्टीसमोर प्रोजेक्ट केले जाते. μOLED प्रोजेक्शन सिस्टम, इन-बिल्ट अॅक्शन कॅमेरा, वायरलेस कनेक्टिव्हिटी, 7,000mAh बॅटरी आणि OTA अपडेट्स ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.
नेक्सएक्ससोबत विकसित केलेले कार्बन फायबर शेल ECE 22.06 आणि CE मानकांना अनुरूप आहे.
टीव्हीएस रेसिंग ऑफरोड ट्रेनिंग अकादमी
मोटोसोलमध्ये टीव्हीएस रेसिंग ऑफरोड अकादमीचेही उद्घाटन झाले. रायडर्सना मूलभूत ऑफरोड आणि अॅडव्हेंचर रायडिंग कौशल्ये शिकवण्यासाठी ही अकादमी उभारण्यात आली आहे.
टीव्हीएस रेसिंग चॅम्पियन्स आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली येथे बाइक हाताळणी, भूभाग मूल्यांकन, शरीर नियंत्रण, संतुलन आणि अडथळे हाताळण्याची कौशल्ये शिकवली जातील. नवशिक्या रायडर्सनाही आत्मविश्वासाने रायडिंग करण्याचा मार्ग येथे मिळणार आहे.
टीव्हीएस रेसिंग X एमटी हेल्मेट्स : सुरक्षा उंचावणारी भागीदारी
जगातील अग्रगण्य प्रीमियम हेल्मेट उत्पादकांपैकी एक असलेल्या एमटी हेल्मेट्ससोबत टीव्हीएस रेसिंगने नवी भागीदारी जाहीर केली.
या सहकार्यांतर्गत ₹5,999 पासून उपलब्ध होणारी, उत्कृष्ट वायुगतिकी आणि जागतिक दर्जाच्या सुरक्षा मानकांसह नवीन श्रेणीची हेल्मेट्स सादर केली जाणार आहेत.
राइड फॉर चेंज : मुलांना 100 हेल्मेटचे वाटप
समाजाभिमुख ‘राइड फॉर चेंज’ उपक्रमाअंतर्गत टीव्हीएसने वॅगेटर येथे सेंट मायकेल कॉन्व्हेंट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना 100 हेल्मेट्स वाटप केली. बालवयातच रस्ता सुरक्षेची जाणीव निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता.
स्टंट शो, आव्हाने आणि संगीताने रंगला दुसरा दिवस
मोटोसोलच्या दुसऱ्या दिवशी रायडरस्फेअर, एफएमएक्स स्टंट शो, जिमखाना आव्हाने, डर्ट-ट्रॅक रायडिंग, मोटोक्रॉस-फिट सत्रे आणि विविध अनुभवात्मक उपक्रमांनी वातावरण रंगून गेले.
मोटो-आर्ट, ग्राफिटी वॉल्स, क्रिएटर इंटरॅक्शन्स आणि संध्याकाळी न्यूक्लीया व लगोरीच्या सादरीकरणाने दिवस अधिक उत्साहात संपला.
टीव्हीएस मोटरचे प्रीमियम व्यवसाय प्रमुख विमल सुंबली म्हणाले,
“मोटोसोल नेहमीच मोटरसायकलिंगच्या भविष्याचा मंच राहिला आहे. नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि रायडर अनुभवांना केंद्रस्थानी ठेवून पुढील वर्षी हा प्लॅटफॉर्म आणखी विस्तारण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”


