अखेर उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबद्दल ‘हा’ झाला निर्णय…
सातारा लोकसभा मतदारसंघातून अखेर उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत भाजप मुख्यालयात जवळपास ३० मिनिटं तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर झालेल्या बैठकीत उदयनराजेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कमळ चिन्हावर ते निवडणूक लढवणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.
उमेदवारी जाहीर होईपर्यंत वेगवगेळ्या गोष्टी घडणार आहेत. अजून वेगवेगळ्या पद्धतीचे अंदाज बांधले जाणार आहेत. उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार असताना अवघ्या सहा महिन्यात राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे हजार उदयनराजे हे कमळाच्या चिन्हावरच लढतील. याआधी सुद्धा भाजपचा जिल्हा कार्यकारिणीने उदयनराजे यांना छुपा विरोध केला होता. अशा प्रकारच्या गोष्टी बोलल्या जात होत्या. मात्र अशा कोणत्याही गोष्टी झालेल्या नाही. उलट उदयनराजेंची एकमताने सगळ्यांनी शिफारस केली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.