‘डबल इंजिन सरकारने केली अर्थसंकल्पात गोव्याची निराशा’
दरम्यान या अर्थसंकल्पावर विविध नेत्यांच्या तसेच आमदारांच्या प्रतिक्रिया येत आहेत. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “डबल इंजिन सरकारने या अर्थसंकल्पात गोव्याची निराशा केली आहे. सरकार गोवावासीयांना दिलासा देण्यात अपयशी ठरले” अशी टिका सरदेसाई यांनी सरकारवर केली.
अर्थसंकल्पात मिष्टी योजनेची घोषणा करण्यात आली. समुद्राला लागून असलेल्या किनारी भागातील खारफुटीचे जतन करण्यासाठी मिष्टी योजना आणली जात आहे. त्यामुळे खारफुटीचे संरक्षण होणार आहे.
मिष्टी या शब्दाचा अर्थ बंगाली भाषेत गोड आहे. मिष्टी योजनेसाठी कॅम्पा फंड चा वापर करण्यात येणार आहे. मात्र गोव्याचा पैसा मध्य प्रदेशमध्ये वनीकरणासाठी वळवण्यात आला आहे. त्यामुळे बजेटमध्ये गोव्याला काहीच मिळाले नाही आहे.
कोळसा वाहतुकीसाठी गोव्याच्या जंगलातील झाडे कापण्याचा घाट का घातला जातोय? डबल ट्रॅकिंगसाठी समुद्री मार्गाचा वापर करावा.
50 जागा टुरिझम डेस्टिनेशन म्हणून निश्चित करुन त्यांचे प्रमोशन केले जाणार आहे. या 50 साईट्स मध्ये गोव्यातील 10 तरी साईट्स प्रमोद सावंत निश्चित करु शकतात का? की म्हादई सारखे हे पण हातातून जाऊ देणार आहेत का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
म्हादई प्रश्नी गोव्यातील सरकारचे केंद्राला काहीच पडले नाही आहे असे या अर्थसंकल्पातून दिसून येते असे सरदेसाई यांनी सांगितले.