google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

वामन प्रभू यांच्या ‘स्तंभ’ पुस्तकाचे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन !

पणजी :

ज्येष्ठ पत्रकार वामन प्रभू लिखित आणि सहित प्रकाशन प्रकाशित ‘स्तंभ’ या नव्या पुस्तकाचे तसेच ‘ मनोहर पर्रीकर ऑफ द रेकॉर्ड ‘ या त्यांच्या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन विधानसभा संकुलात मुख्यमंत्री डाॅ प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. आमदार गणेश गावकर, दाजी साळकर, डाॅ चंद्रकांत शेट्ये आणि प्रविण आर्लेकर यांची यावेळी उपस्थिती होती.

‘स्तंभ ‘ हे पुस्तक पत्रकार वामन प्रभू यांनी मागील वर्षभरात विविध दैनिके आणि साप्ताहिकांतून लिहीलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील लेखांचे संकलन स्वरूप असून सहित प्रकाशनाने ते प्रकाशित केले आहे. पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार सुभाष नाईक यांनी ‘स्तंभ’साठी प्रस्तावना लिहीली आहे.

‘मनोहर पर्रीकर ऑफ द रेकॉर्ड ‘ या पुस्तकास वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून अल्पावधीतच त्याची तिसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे. हे पुस्तक कोकणी आणि हिंदीतही अनुवादित झाले आहे.’ स्तंभ ‘ हे वामन प्रभू यांचे सहावे पुस्तक आहे. मुख्यमंत्री आणि अन्य मान्यवरांनी यावेळी लेखकाचे अभिनंदन केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!