गोवा
धक्कादायक! १० दिवसांची चिमुरडी सापडली बॉक्समध्ये…
मिरामार येथील मनोहर पर्रीकर स्मारकाजवळ १० दिवसांची चिमुरडी बेवारस अवस्थेत आढळून आली. अर्भकाच्या रडण्याचा आवाज ऐकून वाटसरूंनी अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. पणजी पोलिसांनी त्वरित प्रतिसाद दिला.
पोलीस त्वरित घटनास्थळी पोहचले आणि तत्परतेने कचराकुंडीत सापडलेल्या नवजात अर्भकास वैद्यकीय उपचारांसाठी बांबोळीच्या गॉमेकॉत दाखल केले.
दरम्यान, गेल्या पाच वर्षांमध्ये, गोव्यात नवजात अर्भकांना सोडून दिल्याच्या ११ असंवेदनशील घटनांची नोंद झाली आहे. त्यापैकी तब्बल सात घटनांमध्ये लहान मुलींचा समावेश आहे.