24 तास पाणी योजनेच्या बिलात 15 टक्के सूट
कराड (अभयकुमार देशमुख) :
कराड शहरात पालिकेने गेल्या वर्षभरात शुध्द पाणीपुरवठा करण्यासाठी मीटर प्रमाणे पाणी बिल आकारणी सुरू केली. यामध्ये बिलाची रक्कम मोठी आल्याने अनेक राजकीय पक्ष व संघटना यांनी निवेदन देवून तसेच आंदोलन केली. यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या लोकशाही आघाडीने पाणी बिलात नागरिकांना 20 टक्के सूट द्यावी, अशी मागणी केली होती. यावर आज पालिका मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यासोबत चर्चा झाली. यामध्ये 15 टक्के तिमाही पाणी बिलात सूट देणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी लोकशाही आघाडीचे जयवंत पाटील, साैरभ पाटील, नंदकुमार बटाणे यांनी मुख्याधिकाऱ्यांचे आभार मानले. तर 1 एप्रिल 2023 पासून शहराला चोवीस तास पाणी मीटरप्रमाणे मिळणार आहे.