पणजी : गोव्यातील (Goa) पणजीत (Panjim) होणाऱ्या ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI) उद्घाटन वेगळ्या पद्धतीने होणार आहे. शिगमा व कार्निवलची (Shigmo and Carnival) झलक प्रदर्शित करण्याच्या हेतूने जुने सचिवालय ते मनोरंजन संस्थेच्या इमारतीपर्यंत चित्ररथ मिरवणूक होईल. यानंतर मनोरंजन संस्था इमारतीबाहेरच्या स्टेजवर औपचारीक उद्घाटनाचा कार्यक्रम होणार असल्याचे मुख्यमंत्री (Chief Minister) डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी मंत्रालयात पत्रकार परिषद घेतली. फिडे बुद्धीबळ स्पर्धेमुळे ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम उपलब्ध नसल्याचा समज चुकीचा आहे. समारोप सोहळा पूर्वीप्रमाणे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार आहे. तसेच उद्घाटन होणार नसल्याचे फिरत असलेले संदेश सुद्धा चुकीचे आहेत.
नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने उद्घाटन व्हावे, अशी सूचना आयोजकांकडून झाली होती. शिगमा व कार्निवल ही गोव्याची संस्कृती आहे. तीचे दर्शन चित्रपट जगताला व्हावे, यासाठी यंदा चित्ररथ मिरवणुकीने महोत्सवाचे उद्घाटन होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.


