google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या मजबूत

पर्यटकांची सुरक्षितता मजबूत करण्यासाठी, समुद्रकिनाऱ्यांवरील जलक्रीडा क्रियाकलापांचे नियमन करण्यासाठी आणि जलक्रीडा उपक्रमांसाठी आकारण्यात येणाऱ्या दरांमध्ये समानता आणण्यासाठी पर्यटन खात्याने अनेक उपाय योजिले आहेत, अशी घोषणा पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी काल संध्याकाळी पर्वरीतील मंत्रालयात झालेल्या भागधारकांच्या बैठकीनंतर केली.

पर्यटन क्षेत्रातील भागधारकांसह, पर्यटन खात्याचे प्रमुख अधिकारी, कॅप्टन ऑफ पोर्ट्स, किनारी सुरक्षा पोलीस, पर्यटन पोलीस आणि उत्तर तसेच दक्षिण गोव्यातील विविध जलक्रीडा संघटनेचे अध्यक्ष यावेळी उपस्थित होते. या बैठकीत जलक्रीडे संबंधित अनेक गंभीर मुद्द्यांवर सरकार आणि भागधारकांच्या महत्त्वपूर्ण सूचनांसह चर्चा करण्यात आली.

पत्रकार परिषदेला संजीव आहुजा, आयएएस, पर्यटन सचिव; सुनील अंचिपाका, आयएएस, पर्यटन संचालक; कुलदीप आरोलकर, एमडी, (जीटीडीसी) आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

मंत्री खंवटे यांनी अलीकडेच घडलेल्या बोट पलटण्याच्या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आणि व्यवस्थापन उपाययोजना सुधारण्याच्या महत्त्वावर भर दिला.

या आव्हानांना तोंड देण्यासाठी, पर्यटन खाते, कॅप्टन ऑफ पोर्ट्सच्या सहकार्याने राज्यातील जलक्रीडा उपक्रमांसाठी एक सर्वसमावेशक मानक कार्यप्रणाली (एसओपी) तयार करेल. पर्यटन मंत्री खंवटे यांनी यावर भर दिला, की ही एसओपी सुरक्षेच्या निकषांचे काटेकोर पालन सुनिश्चित करेल तसेच गोव्यातील जल क्रीडेची एकूण सुरक्षा आणि गुणवत्ता देखील वाढवेल.

नियामक उपायांचा एक भाग म्हणून, मंत्री खंवटे यांनी जाहीर केले, की सर्व जलक्रीडा चालकांनी प्रथम पर्यटन खात्याकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) प्राप्त करणे आवश्यक आहे. कॅप्टन ऑफ पोर्ट्सकडे नोंदणीसाठी पूर्व-आवश्यकता म्हणून त्यांनी, जल क्रीडा संघटनांचे सदस्य असणे आवश्यक आहे.

अंतिम परवानगी देण्याचे अधिकार कॅप्टन ऑफ पोर्ट्सकडे असताना, ही पायरी सुनिश्चित करते, की केवळ सुरक्षा आणि कार्यकारी मानकांचे पालन करणाऱ्या ऑपरेटरचाच नोंदणीसाठी विचार केला जाईल.

पर्यटन मंत्री म्हणाले, कि “आम्ही जलक्रीडा संघटनेने मांडलेल्या समस्या आणि सूचनांचा काळजीपूर्वक विचार केला आहे. तसेच त्यांना जलक्रीडा उपक्रमांसाठी एकसमान दर लागू करणे, रांग प्रणालीचे पालन सुनिश्चित करणे आणि इतर महत्त्वाच्या बाबींसह समस्यांचे निराकरण करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे”.

संघटनेने आपल्या सदस्यांची जबाबदारी घेणे अत्यावश्यक आहे. या कालावधीनंतर, कॅप्टन ऑफ पोर्ट्स आणि किनारी पोलिस प्राथमिक अंमलबजावणी अधिकारी म्हणून काम करत असताना, कडक अंमलबजावणीचे उपाय लागू केले जातील, असेही ते पुढे म्हणाले.

पर्यटन मंत्र्यांनी गोव्यातील जबाबदार पर्यटनाला चालना देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेची पुष्टी केली आणि सांगितले, की “जलक्रीडा ऑपरेटर सर्वोच्च सुरक्षा आणि कार्यकारी मानकांचे पालन करतात, याची खात्री करण्यासाठी आम्ही ठोस उपाययोजना आखत आहोत. आम्ही त्यांच्यासोबत एकत्रितपणे काम करत असताना आम्हाला त्यांच्या सहकार्याने काम करण्यासाठी त्यांच्या पाठिंब्याची गरज आहे.”

हे उपक्रम पर्यटन प्रशासन बळकट करण्यासाठी, अभ्यागतांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि जबाबदार पर्यटन पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचे समर्पण प्रतिबिंबित करतात.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!