
डास प्रतिबंधक बेकायदेशीर अगरबत्तीमुळे पश्चिम भारतातील 67% लोकांना अस्वस्थ वाटते
मुंबई:
गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) चा भारतातील आघाडीचा घरगुती कीटकनाशक ब्रँड गुड नाईटने केलेल्या सर्वेक्षणानुसार, पश्चिम भारतातील 67% नागरिक बेकायदेशीर आणि नियमबाह्य डास प्रतिबंधक अगरबत्ती वापरल्याने अस्वस्थ किंवा चिडचिडे होतात. “एक डास, अगणित धोके” या शीर्षकांतर्गत देशभरात हा सर्व्हे मार्केट रीसर्च फर्म YouGov आणि गुड नाईट द्वारे करण्यात आला. या सर्व्हेमधून डास प्रतिबंधकांबद्दल लोक काय विचार करतात हे समोर येण्यासोबतच डासांमुळे होणाऱ्या आजारांशी संबंधित जोखीमही अधोरेखित करण्यात आली. पश्चिम भारतातील महाराष्ट्र, गुजरात, पुणे, गोवा आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये डास प्रतिबंधक बेकायदेशीर अगरबत्ती वापरण्यामुळे होणाऱ्या धोक्यांबाबत ग्राहक आवाज उठवत आहेत.
राष्ट्रीय पातळीवर, 69% प्रतिसादकर्त्यांनी डास प्रतिबंधक बेकायदेशीर अगरबत्ती वापरल्याने अस्वस्थ वाटत असल्याबद्दल सांगितले. यात सर्वाधिक प्रमाण हे पूर्व भारताचे (73%) आहे. त्यानंतर उत्तर (69%), दक्षिण (67%) आणि शेवटी पश्चिम भारताचा (67%) नंबर लागतो. या सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 70% पुरुष आणि 67% महिलांनी नोंदणीकृत नसलेल्या चिनी रसायनांच्या अगरबत्ती वापरताना अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले. थोडक्यात, हा एक जागतिक पातळीवरचाच प्रश्न असल्याचे समोर येते आहे.
या सर्वेक्षणानुसार, पश्चिम भारतातील 60% प्रतिसादकर्ते कोणत्या प्रकारच्या डास प्रतिबंधक औषधांची खरेदी करतात याबद्दल अत्यंत सावध आहेत, ते सुरक्षितता आणि नियमनाला प्राधान्य देतात. शिवाय, या भागातील 75% प्रतिसादकर्ते सरकार-मान्यताप्राप्त आणि सुरक्षित डास प्रतिबंधक उत्पादने वापरण्यास प्राधान्य देतात. डासांसंबंधी सुरक्षित उपायांची लोकांना माहिती असून आणि त्याला लोकांची पसंती असूनही, या बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्ती वाढत आहेत आणि मोठ्या संख्येने लोक ते वापरत आहेत.
पश्चिम भारतातील बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्ती मार्केट अंदाजे 320 कोटी रुपयांचे आहे, तर एकूण राष्ट्रीय पातळीवरील हे मार्केट 1600 कोटी रुपयांचे आहे. ही श्रेणी दरवर्षी सुमारे 20% ने वाढत आहे. पश्चिम भारतात, महाराष्ट्र हा बेकायदेशीर अगरबत्तींचे सर्वात मोठे मार्केट आहे, त्यानंतर मध्य प्रदेश आणि त्यानंतर गुजरातचा क्रमांक लागतो.
गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) अंतर्गत होम केअरच्या मार्केटिंग प्रमुख शिल्पा सुरेश म्हणतात, “पश्चिम भारतातील नागरिकांमध्ये बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्तींच्या वाढत्या वापराने येणारी वाढती चिंता आमच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष अधोरेखित करते. यापैकी अनेक अगरबत्ती या बेकायदेशीरपणे बनवल्या जातात, त्यात नियमनाचा अभाव आहे, शिवाय त्यात नोंदणीकृत नसलेली रसायने वापरली जातात, जी आरोग्याला गंभीर धोका निर्माण करू शकतात. भारतातील आघाडीचा डास प्रतिबंधक ब्रँड म्हणून, गुड नाइट कुटुंबांचे संरक्षण करण्यासाठी आणि सुरक्षित पर्यायांचा आग्रह धरण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही विज्ञान आणि नावीन्याच्या आधारे सुरक्षित, सरकार-मंजूर पर्याय उपलब्ध करून देतो. एकत्रितपणे, आपण योग्य पर्याय निवडूया – केवळ आपल्या घरांसाठीच नाही तर देशातील लोकांच्या कल्याणासाठी.”
भारतात घरगुती कीटकनाशकांच्या सुरक्षित वापराला प्रोत्साहन देण्यासाठी काम करणारी एक प्रसिद्ध गैर सरकारी उद्योग संस्था, होम इन्सेक्ट्स कंट्रोल असोसिएशन (HICA) चे मानद सचिव जयंत देशपांडे म्हणाले, “बेकायदेशीर आणि चिनी रसायनयुक्त डास प्रतिबंधक अगरबत्ती ही भारतीय घरांमधील सायलेंट किलर आहे. ग्राहकांची दिशाभूल करणारी नावे तसेच अत्यंत अविश्वासार्ह कंपन्यांनी बनवलेल्या या अगरबत्ती नियामक तपासणीतून जात नाहीत आणि त्यात नोंदणीकृत नसलेली रसायने असतात. सरकारने मान्यता दिलेल्या उत्पादनांच्या पॅकेजिंगवर केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समिती (CIBRC) चा मान्यता क्रमांक असतो, ज्यामुळे ग्राहक खरेदीच्या वेळी त्याची सत्यता पडताळू शकतात. पॅकच्या मागील बाजूस नोंदणी क्रमांक (CIR क्रमांक) असतो आणि त्यानंतर सरकारने दिलेल्या मंजुरीचे वर्ष लिहिले जाते, जे उत्पादनाची सत्यता पटवतेच पण सुरक्षिततेची हमी देते. या मान्यताप्राप्त अगरबत्तीची त्यापूर्वी सुरक्षितता आणि परिणामकारक मानकांची पूर्तता करण्यासाठी वर्षानुवर्षे कठोर चाचणी घेतली जाते. यामुळे ही उत्पादने वापरल्याने आपल्याला कोणतेही नुकसान होणार नाही, हे जाणून लोकांना मानसिक शांती मिळते.”