१ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सगळीकडे ड्राय डे म्हणजेच दारु विक्री ला बंदी असते तरीही सातारा शहरातील हॉटेल लेक व्हू आणि हॉटेल ॲबेसेटर येथे ज्यादा दराने दारु विक्री केली जात असल्याचे राष्ट्रमतच्या हाती व्हिडिओ आले असून यात ज्यादा दराने पार्सल दारू विकत असल्याचे स्पष्ट होत आहे.
हॉटेल लेक व्हू तर उत्पादन शुल्क विभागाच्या नाकावर टिच्चून राजरोसपणे दारू विकताना दिसते . यासंदर्भात आम्ही उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेलो असता त्यांचे कार्यालय बंद होते , यामुळे जर उत्पादन शुल्क विभाग जर आऊटॉप सर्व्हिस असेल तर संबंधितावर कारवाई कोण करणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हॉटेल लेक व्हू मार्फत शासकीय कार्यालयात विवीध कार्यक्रमांना अन्न पुरवठा केला जातो यामुळे यामुळेच यांचा प्रशासनातील अधिकारी वर्गात दबदबा असल्याने हॉटेल लेक व्हू प्रत्येक ड्राय डे ला प्रशासनाच्या नाकावर टिच्चून चढ्या दराने दारु विक्री करतो तरीही कोणत्याही प्रकारची कारवाई यांच्यावर होत नाही यामुळे आता या हॉटेल लेक व्हू वर कारवाई होणार का? अशी विचारणा होत आहे.