
ईडीआयआयकडून टेक स्टार्टअप्ससाठी पीजीडीएम उद्योजकता कार्यक्रम
उद्योजकता शिक्षण देणारी भारतातील आघाडीची संस्था असलेल्या भारतीय उद्योजकता विकास संस्थेने (EDII) आज बेंगळुरू येथे “एंटरप्रेन्योरशिप फॉर टेक स्टार्टअप्स” या विषयात पीजीडीएमची घोषणा केली. हा एआयसीटीई मान्यताप्राप्त व्यवस्थापन कार्यक्रम आहे जो तंत्रज्ञान व्यावसायिकांना उद्योजकतेचे शिक्षण, मार्गदर्शन आणि उद्यम-निर्माण समर्थन देऊन सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेला आहे, जेणेकरून त्यांच्या कल्पना यशस्वी स्टार्टअप्समध्ये रूपांतरित करण्यात मदत होईल.
नव्याने जाहीर केलेले टेक स्टार्टअप्स स्पेशलायझेशन हे एडटेक, हेल्थटेक, फिनटेक, एआय-आधारित व्यवसाय आणि मोठ्या प्रमाणात वाढणारे डिजिटल उपक्रम यासारख्या वेगाने विस्तारणाऱ्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते. व्यावहारिक दृष्टिकोनातून याची रचना करण्यात आली आहे. ज्याचा प्रमुख उद्देश संधी ओळखणे, व्यवहार्यता मूल्यांकन करणे, व्यवसाय मॉडेल तयार करणे, उत्पादन विकास, निधीची तयारी आणि बाजारपेठेत जाण्याच्या धोरणांसह इच्छुक उद्योजकांना विविध कौशल्ये प्रदान करणे हा आहे.
ईडीआयआयचे महासंचालक डॉ. सुनील शुक्ला म्हणाले, “बेंगळुरू हे भारतातील तंत्रज्ञान विकासाचे केंद्र आहे आणि कर्नाटक हे स्टार्टअप बूमच्या केंद्रस्थानी आहे हे लक्षात घेता, आम्हाला वाटले की टेक स्टार्टअप्समध्ये आमचे स्पेशलायझेशन सुरू करण्यासाठी हे अत्यंत योग्य ठिकाण असेल. आज तरुण लोक एका उद्देशाने उद्योजकतेची निवड करिअर पर्याय म्हणून करत आहेत आणि ईडीआयआय उद्योजकतेच्या विकासासाठी एक स्पष्ट मार्ग प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. जो येत्या दशकात किंवा त्याहून अधिक काळ राष्ट्राच्या विकासात योगदान देऊ शकेल आणि 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करू शकेल.”
पीजीडीएम उद्योजकता: नोकरी शोधणाऱ्यांपेक्षा उद्योजक घडवणे
1998 मध्ये सुरू झालेला उद्योजकता या विषयातील दोन वर्षांचा पीजीडीएम अभ्यासक्रम हा भारतातील सर्वात उपयोगी अभ्यासक्रमांपैकी एक आहे, ज्याचा एकमेव उद्देश उद्योजकतेचा विकास हा आहे. या अभ्यासक्रमाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची मान्यता आहे, तसेच नॅशनल ऍक्रिडेशन बोर्डाची मान्यता असून भारतीय विद्यापीठांच्या असोसिएशनमधील एमबीएच्या समतुल्य दर्जाचा आहे.
या कार्यक्रमाचा लाभ घेतलेले 2,200 हून अधिक माजी विद्यार्थी आहेत, त्यापैकी सुमारे 79% सक्रिय उद्योजक होऊ घातले आहेत. त्यामुळे ईडीआयआय शिकवण्यात केवळ पुस्तकी ज्ञानावर भर देत नाही, तर व्यावहारिक दृष्टिकोनावरही भर देते. हा दृष्टिकोन विद्यार्थ्यांना शिकत असतानाच उद्योजकांसारखा विचार करण्यास मदत करतो. विद्यार्थ्यांना संघटित मार्गदर्शन, वास्तविक उद्योगांमधील क्षेत्र अनुभव, ईडीआयआयच्या सेंटर फॉर ऍडव्हान्सिंग अँड लॉन्चिंग एंटरप्रायझेसचा (CALEL) सर्वसमावेशक आणि नियोजनबद्ध अभ्यासक्रम यासोबतच उद्योजकतेत महत्त्वाचा टप्पा गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार केले जाते.
विद्यार्थी सध्या न्यू एंटरप्राइझ क्रिएशन, फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट, सोशल एंटरप्रेन्योरशिप आणि आता टेक स्टार्टअप्समध्ये स्पेशलायझेशन करू शकतात. यामुळे विविध उद्योजकीय मार्गांसाठी पीजीडीएम हे एक व्यापक व्यासपीठ ठरते.
‘टेक स्टार्टअप्ससाठी उद्योजकता’ मधील पीजीडीएम विशेषतः खालील गोष्टींसाठी उपयुक्त आहे:
- उद्योजक होऊ इच्छिणारे तंत्रज्ञान व्यावसायिक (सॉफ्टवेअर, उत्पादन, डेटा/एआय, अभियांत्रिकी, आयटी सेवा)
- व्यवसायाला सुरुवात करतानाच व्यवसायाची मूलभूत तत्त्वे, कठोर अंमलबजावणी आणि मार्गदर्शन
- डिजिटल-प्रथम, तंत्रज्ञान-सक्षम उद्योग तयार करण्यास उत्सुक असलेले नावीन्याची आवड असलेले पदवीधर
कर्नाटकातील मजबूत सीएसआर उपक्रम आणि तळागाळात रुजलेली उद्योजकता
1997 मध्ये बेंगळुरू येथे पहिले प्रादेशिक कार्यालय स्थापन झाल्यापासून, ईडीआयआय राज्यात शैक्षणिक कार्यांपलीकडे सक्रियपणे सहभागी आहे. सीएसआर उपक्रम तसेच राज्य सरकारसोबत भागीदारी करून, महिला सक्षमीकरण, एमएसएमई विकास, तरुणांमध्ये उद्योजकता, शाश्वत व्यवसाय उपक्रम आणि मंड्या, तुमाकुरु, कोलार आणि नेलामंगला सारख्या जिल्ह्यांमध्ये उपजीविकेसाठी व्यवसायाचा विकास यावर लक्ष केंद्रित करत आहे.
अॅक्सेंचर, एचएसबीसी, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, आयडीबीआय बँक अशा सर्वोत्तम कॉर्पोरेट भागीदारांसोबत ईडीआयआय काम करते आणि सीएसआर-निधीद्वारे उद्योजकता कार्यक्रमांना प्रोत्साहन देते. याचा परिणाम कर्नाटक राज्यातील हजारो जीवनांवर, विशेषतः महिला उद्योजकांवर होतो.
बेंगळुरूमधील हुब्बा सारखे नवीन उपक्रम ईडीआयआयच्या तळागाळातील दृष्टिकोनाचे एक उदाहरण आहेत. ते महिलांना घरगुती व्यवसाय किंवा लघु-उद्योगांद्वारे उत्पन्न मिळविण्यास सक्षम करतात.





