आर्किटेक्चर व इंटीरियर डिझाइन मधील प्रभावी व्यक्तींचा ‘गीव्हीज २०२६’मध्ये गौरव
‘गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप’ने आपल्या ‘लॉक्स अँड आर्किटेक्चरल सोल्यूशन्स’ या व्यवसाय विभागामार्फत गीव्हीज अवॉर्ड्स या सोहळ्याच्या पाचव्या पर्वाचे नुकतेच यशस्वी आयोजन केले. हा कार्यक्रम गोवा येथे ७ मार्च २०२६ रोजी झाला. या कार्यक्रमात भारतातील आघाडीचे आर्किटेक्ट, इंटीरियर डिझायनर आणि उद्योगक्षेत्रातील प्रभावी व्यक्ती एकत्र आले होते. वास्तुकला आणि डिझाइन क्षेत्रातील उत्कृष्टता, नवे प्रयोग (इनोव्हेशन) आणि शाश्वतता यांचा गौरव करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
गोदरेज व्हॅल्यू को-क्रिएटर्स क्लब (जीव्हीसीसी) अंतर्गत आयोजित या सोहळ्यात जानेवारी ते डिसेंबर २०२५ यादरम्यान पूर्ण झालेल्या उत्कृष्ट प्रकल्पांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. निवासी, व्यावसायिक, हॉटेल व आतिथ्य, संस्थात्मक तसेच विशेष डिझाइन अशा विविध क्षेत्रांतील १५ श्रेणींमध्ये हे पुरस्कार देण्यात आले.
या वर्षी ‘गीव्हीज अवॉर्ड्स २०२६’साठी देशभरातून मोठ्या प्रमाणात अर्ज आले. यावरून वास्तुकला आणि डिझाइन क्षेत्रात नवीन कल्पना (इनोव्हेशन), शाश्वतता (सस्टेनॅबिलिटी) आणि वापरकर्त्यांच्या गरजांवर आधारित डिझाइन यांना अधिक महत्त्व दिले जात असल्याचे दिसून आले. विजेत्यांची निवड एका कडक आणि सखोल परीक्षक प्रक्रियेद्वारे करण्यात आली. या परीक्षक मंडळात आघाडीचे आर्किटेक्ट आणि डिझाइन तज्ज्ञ सहभागी होते. त्यामध्ये विवेक सिंह राठोर, हार्टमुट, यतीन पटेल, सौरभ चंद्रा, राहुल साठे आणि चरणजीत सिंह शाह यांचा समावेश होता.
या प्रसंगी बोलताना ‘गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप’च्या प्रवक्त्यांनी म्हटले, “गीव्हीज’चा हा पाचवा सोहळा भारतातील डिझाइन क्षेत्राचा गौरव करण्याच्या आणि त्याचे भविष्य घडवण्याच्या आमच्या प्रयत्नांतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. दरवर्षीचा हा उपक्रम उद्योगासाठी एक प्रभावी व्यासपीठ म्हणून विकसित होत आहे. या वर्षी ‘नाविन्यता, शाश्वतता आणि उद्देशपूर्ण डिझाइन’ या संकल्पनेवर आधारित सोहळ्याने दर्जाचा नवा मापदंड निर्माण केला आहे. या वेळी मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले, तसेच अनेक उत्कृष्ट प्रकल्प पाहायला मिळाले. या प्रकल्पांमधून नवे विचार, जबाबदारीने निवडलेली सामग्री आणि विचारपूर्वक तयार केलेल्या जागा माणसांचा अनुभव कसा अधिक चांगला करू शकतात, याची जाणीव दिसून आली. गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप म्हणून आम्ही भारतातील आर्किटेक्चर आणि डिझाइन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यास कटिबद्ध आहोत. ‘गीव्हीज’च्या माध्यमातून आपसांतील सहकार्य वाढवणे, उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करणे आणि डिझाइनमधून भविष्यासाठी अधिक सुरक्षित, स्मार्ट आणि अर्थपूर्ण जागा तयार करण्याची विचारसरणी पुढे नेणे हा आमचा उद्देश आहे.”
या पुरस्कार समारंभात वास्तुकला आणि डिझाइन क्षेत्रातील आघाडीचे तज्ज्ञ, नवोदित व्यावसायिक आणि उद्योगातील भागीदार एकत्र आले होते. त्यामुळे ज्ञानाची देवाणघेवाण, सहकार्य आणि भविष्यातील डिझाइनविषयी चर्चा करण्यासाठी एक उत्साही व्यासपीठ तयार झाले. अधिक सुरक्षित, अधिक स्मार्ट आणि अधिक शाश्वत वातावरण निर्माण करण्यात योगदान देणाऱ्यांचा विजेते म्हणून सन्मान करण्यात आला. या विजेत्यांना गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर आणि भागीदार माध्यमांमध्ये देशभरात प्रसिद्धी मिळणार आहे.
‘गीव्हीज अॅवॉर्ड्स’ची सुरुवात २०२१मध्ये झाली. तेव्हापासून हा पुरस्कार वास्तुकला आणि डिझाइन क्षेत्रातील एक प्रतिष्ठित मानदंड म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. देशभरातील आर्किटेक्ट आणि डिझायनर यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम या उपक्रमाने केले आहे. ‘गोदरेज व्हॅल्यू को-क्रिएटर्स क्लब’चा भाग असलेल्या या उपक्रमामुळे उद्योगातील सहभाग अधिक मजबूत होत असून, नवीन कल्पना, जबाबदार डिझाइन पद्धती आणि ज्ञानाची देवाणघेवाण यांना प्रोत्साहन मिळत आहे.
‘गीव्हीज अवॉर्ड्स २०२६’चे विजेते :
१. कम्पार्टमेंट एस-फोर – विभाग : आर्किटेक्चर → सार्वजनिक व संस्थात्मक इमारत
२. मिलाना मालाडकर आणि अरविंद जगन्नाथन – विभाग : आर्किटेक्चर व इंटीरियर → शैक्षणिक प्रकल्प
३. श्रेया संघवी आणि विपुल संघवी – विभाग : आर्किटेक्चर व इंटीरियर → सर्वात सुरक्षित प्रकल्प
४. मनोज पटेल – विभाग : आर्किटेक्चर व इंटीरियर → लहान शहरांतील व्यावसायिक प्रकल्प (लोकसंख्या १ लाखांपेक्षा कमी)
५. प्राची पारेख वोरा आणि विनीत जे. वोरा – विभाग : आर्किटेक्चर व इंटीरियर → लहान शहरांतील निवासी प्रकल्प (लोकसंख्या १ लाखांपेक्षा कमी)
६. रोनक मुकेश पटेल – विभाग : आर्किटेक्चर व इंटीरियर → मल्टी-युनिट हाउसिंग
७. ओंकार वैंगणकर – विभाग : आर्किटेक्चर व इंटीरियर → आरोग्यसेवा प्रकल्प
८. मनीष बँकर – विभाग : आर्किटेक्चर व इंटीरियर → हॉस्पिटॅलिटी प्रकल्प (५० पेक्षा जास्त खोल्या)
९. श्रवण प्रदीप आणि मेघा ननैय्या – विभाग : आर्किटेक्चर → निवासी व्हिला व बंगलो
१०. स्नेहा ओस्तवाल – विभाग : इंटीरियर डिझाइन → व्यावसायिक प्रकल्प (३००० चौ.फु. पेक्षा मोठा)
११. दीपिका सेठी – विभाग : आर्किटेक्चर व इंटीरियर → हॉस्पिटॅलिटी प्रकल्प (५० पेक्षा कमी खोल्या)
१२. बिजॉय रामचंद्रन आणि सुनिता कोंदूर – विभाग : इंटीरियर डिझाइन → निवासी अपार्टमेंट / व्हिला / बंगलो (३००० चौ.फु. पेक्षा मोठा)
१३. प्रणवी जैन आणि ध्रुव डीव्ही – विभाग : इंटीरियर डिझाइन → व्यावसायिक प्रकल्प (३००० चौ.फु. पेक्षा लहान)
१४. कोपल त्रिवेदी – विभाग : इंटीरियर डिझाइन → निवासी अपार्टमेंट / व्हिला / बंगलो (३००० चौ.फु. पेक्षा लहान)
१५. मालविका महेश आणि राहुल कुमार – विभाग : इंटीरियर डिझाइन → निवासी अपार्टमेंट / व्हिला / बंगलो (३००० चौ.फु. पेक्षा लहान)






