सिनेनामा 

​स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘देश राग’चे  फोंड्यात दोन विशेष प्रयोग

पणजी : ​ स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे, ​नॉलेज टर्मिनस निर्मित आणि परिक्रमा आर्टिस्ट्स’ कलेक्टिव्ह प्रस्तुत ‘​ देश राग’ या दोन अंकी कोकणी नाटकाचे विशेष प्रयोग १५ ऑगस्ट रोजी फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरात होणार आहेत. हे दोन्ही प्रयोग प्रेक्षकांसाठी मोफत खुले आहेत.

या नाटकाचे विशेष आकर्षण म्हणजे गोव्याचे आमदार गोविंद गावडे हे ‘बाळा राया मापारी’ यांची भूमिका साकारत आहेत. त्यांच्यासोबत रोहित खांडेकर, पृथा परब आणि मेघराज आकेरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला पहिला प्रयोग दुपारी ३ वाजता ​खास विद्यार्थ्यांसाठी, तर दुसरा प्रयोग सायंकाळी ७ वाजता सर्वांसाठी ​खुला असणार आहे. विद्यार्थ्यांना इतिहास केवळ पाठ्यपुस्तकातून न समजता रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवता यावा, हा विद्यार्थ्यांसाठीच्या विशेष प्रयोगामागील महत्त्वाचा उद्देश आहे.​ 

​देश राग’ हे नाटक ​गोव्याचे आद्य स्वातंत्र्यसैनिक बाळा राया मापारी यांच्याशी आणि गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याशी निगडित इतिहास आणि त्यातील संघर्ष, त्याग व स्वातंत्र्याची जिद्द रंगमंचावर मांडते. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर या नाटकाच्या विशेष प्रयोगांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

नाटकाचे लेखक युगांक नायक असून दिग्दर्शन श्रीकांत गावडे यांनी केले आहे. ​तर प्रकाश योजना तेजस खेडेकर​,  नेपथ्य सुशांत तारी, आणि संगीत तुषार कामत, सिंधुराज कामत आणि उपेंद्र साळगावकर यांचे आहे. ​रंगमंच व्यवस्थापन सतीश गावकर, कोरिओग्राफी : चेतन खेडेकर, ​रंगभूषा एकनाथ नाईक, ​वेशभूषा गौरी गावकर आणि प्राची केरकर, तर निर्मिती प्रमुख : जितेंद्र शिकेरकर आहेत.

नुकत्याच​ झालेल्या संगीत नाटक अकादेमीच्या राष्ट्रीय नाट्य महोत्सवात या नाटकाचे गोव्यातून विशेष सादरीकरण झाले होते. ​ स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी गोव्याच्या इतिहासातील एका महत्त्वपूर्ण पर्वाची रंगमंचीय अनुभूती घेण्याची संधी या दोन्ही मोफत प्रयोगांमधून प्रेक्षकांना मिळणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!