google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

नाईट राईड सुरू करुन ‘राजधानी’चे अस्तित्व मिटवण्याचा डाव कोणाचा ?

सातारा (महेश पवार) :

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर कास पठार ,‌ठोसेघर ,कोयना हा सह्याद्री चा पट्टा हा वन्यजीव आणि जैवसंपदा संपन्न परिसर असल्याने आणि जागतिक पर्यटन स्थळ असल्याने या परिसरात लाखो पर्यटक येत असतात , कास पठारावर पर्यटकांच्या साठी नाईट सफर सुरू केल्या मुळं स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार म्हणत राजमार्गावरची रहदारी वाढवत महाबळेश्वर ते कास रस्त्यावर काही राजकीय व धनदांडग्यांनी एकत्र येत राजमार्गावर जवळपास हजार एकर जमीन आधी कवडी मोल भावात घेतल्या आणि नाईट राईड च्या नावाखाली या मार्गावर रहदारी वाढवत थेट राजकीय व धनदांडग्यांच्या जमिनीचा भाव वाढविण्याचा प्रयत्न सुरू झाला.

तर कास पठारावरून थेट परळी व्हाया ठोसेघर रस्ता होत असल्याची माहिती समोर येत असून काही वर्षांपूर्वी उरमोडी धरणाच्या काठावर शेकडो एकर जमिनी राज्यातील एका बड्या नेत्यांच्या मुलीनं व एका स्थानिक नेत्यांनी घेतल्याची चर्चा असून त्यांच्या जमिनीतून थेट ठोसेघर ला जोडण्यासाठी नवीन डोंगर वाट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत , यामुळे भविष्यात याठिकाणच्या जमिनीचा भाव गगनाला भिडणार यात तिळमात्र शंका नाही.

यामुळे पर्यटकांना महाबळेश्वर_कास_ठोसेघर_व्हाया कोयना पाटण मार्ग सुरू केल्याने ऐतिहासिक मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखणार्या सातारा शहरातील व्यवसाय यावर खुप मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार असून यामुळे राजधानी सातार्याचे अस्तित्वाला धोका निर्माण करून राजधानी सातार्याचे अस्तित्व मिटवण्याचा डाव नेमका कोणाचा ? अशी संपूर्ण सातारकरांमध्ये चर्चा आहे .

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!