
गोदरेज प्रोफेशनलकडून ‘ऑरम ब्राउन्स’ कलेक्शन सादर
मुंबई : गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या (GCPL) व्यावसायिक हेअर केअर ब्रँड ‘गोदरेज प्रोफेशनल’ने ‘ऑरम ब्राउन्स कलेक्शन’ सादर केले आहे. ‘कलर प्ले’ हेअर कलर रेंजअंतर्गत सादर करण्यात आलेल्या या कलेक्शनमध्ये रोस्टेड आल्मंड, बटरस्कॉच ब्लाँड आणि हॉट चॉकलेट ब्राउन या तीन रंगछटांचा समावेश आहे. सणासुदीच्या काळात सलूनमधील हेअर कलर सेवांना मिळणारी मागणी लक्षात घेऊन हे कलेक्शन विकसित करण्यात आले आहे.
बदलती फॅशन, वैयक्तिक शैलीविषयी वाढती जागरूकता आणि व्यावसायिक सलून सेवांची वाढती लोकप्रियता यामुळे हेअर कलर बाजारपेठेत नव्या उत्पादनांना वाव मिळत आहे. या पार्श्वभूमीवर गोदरेज प्रोफेशनलने भारतीय त्वचेच्या रंगछटांना अनुरूप असलेल्या ब्राउन रंगांच्या विविध पर्यायांवर भर दिला आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, रोस्टेड आल्मंड या रंगछटेत नट्ससारखा उबदार तपकिरी रंग, बटरस्कॉच ब्लाँडमध्ये सोनेरी-तपकिरी छटा, तर हॉट चॉकलेट ब्राउनमध्ये गडद आणि समृद्ध तपकिरी रंगाचा समावेश आहे. सणसमारंभांपासून लग्नसोहळ्यांपर्यंत विविध प्रसंगांसाठी हे रंग उपयुक्त ठरतील, असा कंपनीचा दावा आहे.
गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या हेअर कॅटेगरीच्या मार्केटिंग विभागाच्या असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट भूमीका गोयल यांनी सांगितले की, सलूनमधील एकूण हेअर कलर वापरामध्ये ब्राउन रंगछटांचा वाटा सुमारे २० टक्के आहे. ‘ऑरम ब्राउन्स कलेक्शन’च्या माध्यमातून कंपनीने आपल्या ‘कलर प्ले’ उत्पादनश्रेणीचा विस्तार केला असून, ग्राहकांना व्यावसायिक दर्जाचे हेअर कलर पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे.
गोदरेज प्रोफेशनलचे राष्ट्रीय तांत्रिक प्रमुख शैलेश मूल्या यांच्या मते, या कलेक्शनमध्ये पारंपरिक ब्राउन रंगांना आधुनिक रंगसंगतीची जोड देण्यात आली आहे. केसांची चमक आणि निगा लक्षात घेऊन तयार केलेल्या या उत्पादनांमध्ये हायलुरॉनिक ॲसिड आणि हायड्रोलाइज्ड केराटिनचा समावेश असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
या नव्या कलेक्शनच्या माध्यमातून महानगरांसह टियर-२ शहरांमधील सलून व्यवसायात आपली उपस्थिती वाढवण्याचा ब्रँडचा प्रयत्न आहे. व्यावसायिक हेअर कलर सेवांची मागणी पूर्ण करण्याबरोबरच बदलत्या सौंदर्यविषयक ट्रेंडनुसार उत्पादनांची श्रेणी विकसित करण्यावर कंपनीचा भर आहे.
गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड ही गोदरेज समूहाचा भाग असून, भारतासह इंडोनेशिया आणि आफ्रिकेतील विविध बाजारपेठांमध्ये कार्यरत आहे. घरगुती कीटकनाशके, एअर केअर, हेअर केअर आणि वैयक्तिक निगा उत्पादनांच्या क्षेत्रात कंपनीचा व्यवसाय आहे.







