google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

‘आप’च्या सागर भोगावकर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

सातारा (महेश पवार) :

शहरात अनेक मोठ्या धेंडांची अतिक्रमणे आहेत. त्याविरुध्द निवेदने, तक्रारी देवून देखील कारवाई केली जात नाही. मोठ्या धेंडांना संरक्षण दिले जाते. मात्र, कोणी तरी तथाकथित समाजसेवक 10 मिनिटे उपोषणाला बसल्यावर गरीब हॉकर्सवर कारवाई केली जाते. ती थांबवा तसेच पालिकेतील मुख्याध्याधिकाऱ्यांसह भागअधिकारी, निरीक्षक भ्रष्ट्राचारी असून त्यांना हटवा, अशी मागणी आम आदमी पक्षाचे सागर भोगावकर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सागर भोगावकर यांनी अंगावर रॉकेल ओतून घेवून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्या अंगावर पाण्याचे फवारे उडवून ताब्यात घेतले. यावेळी सागर भोगावकर यांनी सातारा पालिकेतील भ्रष्ट कारभारावर आरोप केले.सातारा शहरात अनेक ठिकाणी मोठया धेंडांची अतिक्रमणे आहेत. याबाबत मुख्याधिकारी बापट यांना निवेदने, तक्रारी दिल्या तरी त्यावर कारवाई होत नाही. उलट पोटासाठी जगणाऱ्या हॉकर्सवर अन्यायकारक कारवाई करण्यात येते.

त्यांच्याकडून हप्ते वसुलीसाठी पालिकेतील डोंबे, सतीश साखरे हे एंजट कार्यरत असून या भिकाऱ्यांना पालिकेतून हाकलून द्या, अशी संतप्त मागणीही यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सागर भोगावकर यांनी केली.कोणीतरी तथाकथित समाजसेवक 10 मिनिटे उपोषणाला बसतो आणि पालिका गरीब हॉकर्सवर कारवाई करायला सुरुवात केले. त्यांच्या जगण्याचा हक्क हिरावून घेतले. मुळात रजताद्रीमध्ये जिथे बनकर, सुशांत मोरे बसतो त्यांचे अतिक्रमण पालिकेने काढावे. तिथे पालिकेचे लक्ष जात नाही. मात्र, हॉकर्सवर कारवाई केली जाते, असे सांगत भोगावकर यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, भोगावकर यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतल्याने पोलिसांची मोठी धावपळ उडाली होती. त्यांनी तातडीने भोगावकर यांना पकडून त्यांच्यावर अग्निशामक दलाच्या गाडीतून पाण्याचा फवारा सोडला व भोगावकर यांना ताब्यात घेतले.यावेळी शहराध्यक्ष संजय पवार जिल्हाध्यक्ष सादिक भाई पैलवान जिल्हा कार्याध्यक्ष संदीप माने जिल्हा सचिव दीपक शिंदे  जिल्हा खजिनदार विनोद मोरे देवा राजे महाडिक अभी जाधव संतोष पवार तानाजी जाधव आबा डागा व वयाच्या शेकडो  संघटनेचेेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!