इंडस टॉवर्सने उभारला पणजीत मोबाईल टॉवर
पणजी :
देशभरातील संभाषण सेवा अधिक सक्षम करण्याचे आपले वचन पूर्ण करण्याच्या उद्देशाने इंडस टॉवर्स लिमिटेडने आज मोबाईल टॉवर्सचे गोव्याती पणजी येथे उद्घाटन करण्यात आले. या नवीन टेलिकॉम टॉवर्स ची बांधणी ही इंडस टॉवर्स तर्फे करण्यात आली असून यामुळे आता कंपनी कडून भारतात परवडणार्या दरात, उच्च गुणवत्तेने युक्त आणि विश्वसनीय सेवा देण्याचे वचन अधोरेखित होत आहे. गोवा टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर पॉलिसी २०२० चा एक भाग म्हणून राज्यातील विविध भागात अशा प्रकारचे २५५ मोबाईल टॉवर्स सुरु करण्यात येणार आहेत.
यावेळी बोलतांना गोव्याचे मुख्यमंत्री मा. डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले “ भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या डिजिटल इंडियाच्या हाकेला प्रतिसाद देत गोवा आता डिजिटल क्रांतीच्या दिशेने अग्रेसर आहे. गोवा स्टार्ट अप पॉलिसी, ऑनलाईन ईसर्व्हिसेस पोर्टल आणि कोडिंग तसेच शालेय स्तरावरील रोबोटिक्स एज्युकेशन पॉलिसी यांद्वारे राज्यात डिजिटल पध्दतींचा विकास करण्यात येत आहे. डिजिटल क्रांती मध्ये मोबाईल टावर्स महत्त्वपूर्ण भुमिका बजावतात कारण यामुळे केवळ शिक्षणच नव्हे तर सर्व सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात मोठे बदल घडू लागतात.
मी इंडस टॉवर्स कडून गोव्यातील पणजी मध्ये नवीन मोबाईल टॉवर्स बसवल्या बद्दल त्यांचे अभिनंदन करतो. यामुळे आता राज्यातील टेलिकम्युनिकेशन सुविधांमध्ये ही मोठी वाढ होऊ शकेल.”
या टॉवर्सचे उद्घाटन करतांना इंडस टॉवर्स चे एमडी आणि सीईओ बिमल दयाल यांनी सांगितले “ आपला देश हा वेगाने डिजिटल इंडिया चे स्वप्न पूर्ण करण्याकडे अग्रेसर असून याकरता टेलिकॉमच्या पायाभूत सुविधा असणे खूपच आवश्यक आहे. इंडस टॉवर्स च्या वतीने राज्य प्रशासनाच्या सहकार्याने गोव्यात नवीन डिजिटल सुविधांचे जाळे निर्माण करतांना आंम्हाला आनंद होत आहे. भारतातील डिजिटल क्रांतीत आपले योगदान देऊन जागतिक स्तरावरील टेलिकॉम पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देत क्रांती घडवण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत