google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘पोर्तुगालला जाण्यापूर्वी पुराभिलेख मंत्र्यांनी ‘हे’ करावे’

पणजी:

राज्यातील ऐतिहासिक महत्त्वाच्या अमूल्य दस्तऐवजांकडे दुर्लक्ष करून, पोर्तुगालमधून गोव्याच्या इतिहास संबंधित ऐतिहासिक दस्तऐवज आणण्याबाबत पुराभिलेख मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केलेल्या विधानाचे आम आदमी पक्षाने टीका केली.

राज्यातील 1595 साली स्थापन झालेले अभिलेखागार आणि पुरातत्व संचालनालय हे संपूर्ण देशातील सर्वात जुने अभिलेखागार आहे. अधिक दस्तऐवजासाठी पोर्तुगालला धावण्याआधी, फळदेसाई यांनी मळा-पणजी येथील अभिलेखागार इमारतीची स्थिती पाहावी ज्यामध्ये शतकानुशतके जुनी दस्तऐवज आहेत. कदाचित फळदेसाई यांना पुराभिलेख मंत्री म्हणून आपली जबाबदारी समजलेली दिसत नाही असा टोला आप गोवा प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी लगावला.

दरवर्षी मळा-पणजी क्षेत्र पुरामुळे पाण्याखाली जातो. पावसाळ्यातील ओलसरपणा या अमूल्य दस्तऐवजांना मोठा धोका निर्माण करतो. पूरस्थिती इतकी वाईट असते की पावसाळ्यात रेकॉर्ड क्षेत्र अनेकदा लोकांसाठी बंद ठेवावे लागते, असे पालेकर यांनी सांगितले.

पोर्तुगालमधील दस्तऐवज “आणखी रहस्ये उघड करू शकतात” फळदेसाई यांच्या या विधानावर भाष्य करताना आप उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक म्हणाले. भाजपची तथाकथित “गोवा फाइल्स” रणनीती गोमंतकीयांच्या एकतेपुढे सपशेल अयशस्वी ठरल्यानंतर आता सावंत सरकार नवे वाद निर्माण करण्याचा आणि त्यांच्या कारभारातील अपयश लपविण्यासाठी हा विषय पोखरून काढत आहे.

आप नेते सुनील सिग्नापूरकर यांनी आठवण करून दिली की, गेल्या वर्षी ‘आप’ने उघड केलेल्या इफ्फी पेंटिंग घोटाळ्यात तेव्हाचे ईएसजीचे अध्यक्ष सुभाष फळदेसाई यांना आप ने रंगेहाथ पकडले होते, जेव्हा हे काम त्यांच्या निश्चित कंत्राटदारांनी निविदा काढण्यापूर्वीच पूर्ण केले होते.

गोव्याचा सध्याचा पुरातन वारसा जतन करण्याच्या तातडीच्या गरजेबद्दल फळदेसाई अनभिज्ञ आहेत. शिवाय हा दौरा वारसा आणखी समृद्ध करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला नाही. ही केवळ करदात्यांच्या खर्चावर केलेली दौरा आहे. या दौऱ्यामुळे गोमंतकीयांना भेडसावणारे ज्वलंत प्रश्न सुटणार नाही, अशी टीका सिग्नापूरकर यांनी केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!