google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

”हा’ तर सरकारने रेती माफियाला दिलेल्या प्रोत्साहनाचाच परिणाम’

मडगाव :
रेती उत्खनन कामाचे नियमन करण्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे अपयश आणि बेकायदा रेती व्यवसायाला दिलेले प्रोत्साहन यामुळेच कुडचडे येथे बंदुकीच्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे, असा सणसणाती आरोप काँग्रेसचे कार्याध्यक्ष व कुंकळ्ळीचे आमदार आमदार युरी आलेमाव यांनी केला आहे.

आज कुडचडे येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, युरी आलेमाव यांनी रेती आणि चिरे व्यवसायातील बेकायदेशीर कामांना प्रोत्साहन देण्याच्या भाजप सरकारच्या अजेंड्यावर जोरदार टीका केली.

गोव्यात पर्यावरणाचा ऱ्हास जोरात सुरू आहे. गोव्यात कार्यरत असलेल्या विविध माफियांकडे सरकार जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे. भाजप सरकार गोमंतकीयांना सणासुदीच्या काळात सुद्धा सुरक्षा पुरवू शकत नाही हे दुःखद आहे असे युरी आलेमाव म्हणाले.

भाजप सरकारच्या बेजबाबदार वृत्तीमुळेच गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था पुर्णपणे ढासळल्यानेच गुन्हेगार दिवसाढवळ्या गुन्हे करण्यास धजत आहेत. लोकांवर कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांची भीती नाही. पोलीस व इतर अधिकारी सरकारचे कठपुतळे बनल्याने त्यांनी सर्व विश्वासार्हता गमावली आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

पोलिस अधिकार्‍यांनी त्वरीत कारवाई करावी आणि कुडचडे येथील घटनेत सहभागी असलेल्या सर्वांना त्वरीत अटक करावी अशी माझी मागणी आहे. गोव्याच्या पोलीस महानिरीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गोळीबाराच्या घटनेच्या मूळ कारणाचा शोध घ्यावा आणि यातील मास्टरमाइंडला देखील त्वरित जेरबंद करावे अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!