लेख
रा स्व संघ आणि मुस्लिम समाज
– अस्लम जमादार
सरसंघचालक मोहन भागवत ह्यांनी नुकतेच व्यक्त केलेले विचार सर्वधर्मियांना आत्मपरीक्षण करण्यासारखे आहे असेच म्हणावे लागेल. त्यांनी केलेल्या स्पष्ट मांडणीमुळे बहुतांशी मुस्लिमांच्या पारंपरिक संघबद्दलचा जो रोष अर्थात मत होते. ते बदलन्याची सकारात्मकता येईल का? हा मात्र येणारा काळच ठरवेल असेच म्हणावे लागेल ? . एक मात्र खरे अलीकडील काळातील संघ म्हणा अथवा भागवत ह्यांचे मत अर्थात दिशा हि थोडक्यात मुस्लिम अर्थात अल्पसंख्यांक ह्यांना खरोखरच बरोबर घेऊन प्रगती साठी पुढे जायचे कि मता साठी किंवा विरोधकांना खच्ची करण करून त्यांना पूर्णतः नेस्तनाबूत करायचे अशी संभ्रमता मुस्लिमाना पडणे आता स्वाभाविक आहे.
RSS अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षे साजरी करण्याच्या उंबरठ्यावर आहे . त्याचवेळी मोदी सरकार ला पुन्हा केंद्रात येताना जर हॅटट्रिक यशस्वी पणे साध्य करायची असेल तर अल्पसंख्यानक ह्यांना बाजूला सारत न्हवे तर त्यांच्या आर्थिक प्रगती साठी ठोस पावले हि उचलावीच लागतील. RSS म्हणजे केवळ हिंदू धर्मच आणि मुस्लिम ह्यांच्या विरोधात कार्य करणारी अशी देशव्यापी संघटना असेच आज पावेतो चित्र सर्व सामान्य मुस्लिम मान्य करतात . एक अर्थाने ते खरे हि आहे सर्व सामान्य मुस्लिम जो कित्येक पिढ्या शेकडो वर्षे येथे इतर धर्मियाशी गुण्या गोविंदाने राहत आहे त्याला अशी अंतर्गत अशी भीती वाटू लागली आहे के हे मोदी सरकार हिंदू राष्ट्र बनविणार आणि हिंदू राष्ट्र झाले कि आपणास भारत देश सोडून जावे लागणार?
परंतु प्रथमच भागवत ह्यांनी हिंदू राष्ट्र ह्याची संकल्पना तत्वशा सरळ आणि सोप्या भाषेत मांडल्यामुळे केवळ मुस्लिमच न्हवे तर हिंदू ह्यांना खऱ्या हिंदू राष्ट्र बद्दल समजून घ्यावा लागेल जो भागवत अर्थात रा स्व संघ ह्यांना अभिप्रेत आहे . जो भारत देश मध्ये राहतो- सर्वांशी गुण्या गोविन्दाने राहतो – इथल्या मातीशी प्रामाणिक राहतो आणि सदैव राष्ट्राचे भले चाहतो त्या साठी सर्वस्वी योगदान करतो ते हिंदू राष्ट्र . हिंदुस्तान मध्ये राहणारा प्रत्यके नागरिक हा हिंदू म्हणून मुस्लिम ह्यांनी नाराज होण्याचे मुळीच कारण नाही तर दुसरी कडे आमचे हिंदू म्हणून मुस्लिम व इतर धर्मियांना येथे स्थान नाही असे समजण्याचे हि कोणतेही कारण नाही . म्हणूनच हिंदू राष्ट्र बनण्यासाठी केवळ हिंदूच न्हवे तर मुस्लिमाना देखील आता पुढे येणे महत्वाचे ठरणार आहे.
हिंदू राष्ट्र बद्दलचे एक बोलके सत्य उदाहरण मुद्दाम हुन मला येथे नमूद करावेसे वाटते घटना १९९८ साल आणि स्थळ पॅरिस अर्थात फ्रांस देशातील हिंदू राष्ट्र ह्या भागवत ह्यांच्या विधानाने मला माझ्या २५ वर्ष पूर्वी केलेल्या यूरोप टूर ची आठवण येते , मी जन्माने मुस्लिम असून देखील एका नामांकित पुण्यातील के एस बी ह्या जर्मन बहुराष्टीय कंपनीत माझी १९९५ साली गुणवत्तेवर सिनियर वेल्डिंग अभियंता ह्या पदावर निवड झाली . विशेष म्हणजे मी मुस्लिम असून देखील माझी निवड करणारे शिरीष कुलकर्णी / श्रीराम पोंक्षे सारखी कोकणस्थ तर माझे प्रतिस्पर्धी देशपांडे / जोशी नावाची पुण्यातीलच आठहून अधिक विद्यार्थी परंतु मी एकमेव मुस्लिम असून देखील माझी निवड होताच मला यूरोप ला उच्च तांत्रिक शिक्षणासाठी पाठविण्यात आले. अशाच एका क्षणी फ्रांस मधील अनेसी ह्या शहरातील एका मिनी ऑलिम्पिक आईस हॉकि स्पर्धेत मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविले त्या वेळी मी हिंदू -अस्लम जमादार असे उदगार काढताच टाळ्यांचा कडकडाट झाला सदर घटनेची अर्थात हिंदू -अस्लम अशा बातम्या ( विडंबनात्मक ) तेथील नामांकित वर्तमानपत्रात झळकल्या तेव्हा फ्रान्स मधील ३-४ पिढ्या वास्तव्य करणारी भारतीय मंडळी मला चक्क भेटावयास आली आणि माझा सत्कार आणि अभिनंदन केले तेव्हा मी पुरता भारावून गेलो.. मी तसा पडलो एक सामान्य / अराजकीय अशी व्यक्ती परंतु हिंदू ह्या शब्दामुळे माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच जो बदलला..ते सांगणे कठीण ,माझे नाव क्षणात यूरोप व भारतीय वरिष्ठ मंडळींच्या कानी गेले. …आज भागवत ह्यांच्या विधानाने मला २५ वर्ष पूर्वीचा प्रसंग आठवला आणि अशा हिंदू राष्ट्र कल्पना पुन्हा एकदा जागृत झाल्या.
भारताला स्वातंत्र्य मिळाले ते सन १९४७ साली आणि RSS ची स्थापना त्या पूर्वी म्हणजे सन १९२५ तब्बल २२ वर्षे पूर्वीची . हे पाहणे हि महत्वपूर्ण ठरते . RSS ची स्थापना कोणी आणि कशासाठी केली आणि मुख्य ध्येय हिंदू हे एक अखंड राष्ट्र असावे आणि ज्या राष्ट्र मध्ये सर्व जण गुण्या गोविन्दाने एक संघ समाज राहावे अशी हि साधी कल्पना. परंतु हिंदू ह्या शब्द मुळेच दोन व इतर धर्म मध्ये गेली शंभर वर्षे दरी रुंदावत गेली ती तब्बल आजपावेतो अर्थात भागवत ह्यांनी मांडण्याची जे धैर्य दाखविले ते खरोखरच कौतुकास्पद असेच वर्णावे लागेल.
दुसरीकडे एकदा हिंदू राष्ट्र निर्माण झाले कि मुस्लिम ह्यांना भारता बाहेर पडावे लागेल अशी चुकीची कल्पना काही राजकीय पक्षांनी करून मुस्लिम समाजाला आपल्या हातातील गेली ६-७ दशके कायमचे बाहुले बनविले हे आपण पहिले आहेच. दुसरीकडे आमिषे, खोटी आश्वासने आणि अनुदान देत मुस्लिम समाज वरील पकड त्यांनी आणखी घट्ट केली आणि फलनीती म्हणून तब्बल ६ दशके यशस्वीरीत्या सत्ता भोगण्यात पूर्णतः यशस्वी झाले स्वातंत्र्य नंतर तब्बल काँग्रेस पक्षाने ६ दशके राज्य केले आणि मुस्लिम समाजाला असे बिंबित केले कि त्यांचे नागरी हक्काचे रक्षण करणारे केवळ आम्हीच आहोत त्यामुळे त्यांना जातीयवादी पक्षापासून विशेषतः जनसंघ / भा ज प कडून दूर ठेवण्याचे यशस्वी कारस्थान करण्यात ते नेहमीच यशस्वी होत गेले
दुसरीकडे जातीयवादी पक्ष नेहमीच काँग्रेस मुस्लिमाना सकारात्मक पाहत असल्याचं आणि त्यांना उदार मत अवलंबून अनेक सवलती वेळो वेळी देत असल्याची टीका करू लागण्यात मग्न झाले ह्या सवलती मध्ये मुख्यतः मुस्लिमांची वाढत जाणारी लोकसंख्या आणि हज साठी देण्यात येणारे अनुदान हे नेहमीच चर्चिले गेले अर्थात त्यामुळे नेहमीच अशा बाबी मुळे मुस्लिम समाज बदल इतर समाजाला राग अर्थात घृणा निर्माण होणे स्वाभाविक होते परंतु ह्या समस्येचा ना इतर धर्मानी ना मुस्लिम समाजानी कधी आत्मपरीक्षण केले नाही कि त्या वर अभ्यासपूर्ण संशोधन आणि त्यामुळेच मुस्लिम समाज म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीत काही काळात हिंदू पेक्षा अधिक लोकसंख्या निर्माण करण्यात यशस्वी होऊन हिंदू च अल्पसंख्यांक होतील कि काय अशी भ्रामक कल्पना भीती पोटी रंगू लागल्या
परंतु काँग्रेसचे राजकीय धोरण आणि जातीयवादी पक्ष ह्यांची मुस्लिम समाजाबद्दलची निर्माण झालेली तिरस्कार भूमिका ह्या मुळे मुस्लिम समाजाचे अतोनात हाल होत गेले न्हवे ते ठेवण्यात काँग्रेस आणि जातीयवादी पक्ष नेहमीच यशस्वी होत गेले पर्यायाने मुस्लिम समाज म्हणजे केवळ अडाणी , वैचारिक दृष्टी नसलेला आणि धार्मिक बरोबर ते दहशतवादी पर्यंत असे चित्र निर्माण होऊ लागले
अर्थात ह्या बाबीचा उहापोह अर्थात त्यावर योग्य उपाय पर्याय ह्या बाबतीत मुस्लिम समाजातील धार्मिक मंडळी असोत कि समाजसेवक हे नेहंनीच एका ठराविक परिघावर काम करत राहिल्याने समाज हा प्रगती करण्याची तर सोडाच परंतु बदनाम होऊ लागला त्याचा मोठा फटका सामान्य , निरपराध मुस्लिम ना होऊ लागला दुसरे हे मान्य करावे लागेल कि मुस्लिम समाजा मध्ये एक संघ निर्माण होण्यासाठी मोठे राष्ट्रीय नेतृत्व कधीच निर्माण झाले नाही जे नेतृत्व समाज सुधारणे साठी तारण ठरू शकेल .
स्वातंत्र्य काळानंतर राष्ट्रपती मौलाना अबुल कलाम आझाद , डॉ झाकीर हुसेन हे जरी नेतृत्व उदयाला आले असले तरी ते काँग्रेस च्या परिघातच राहिले त्यामुळे समाज सुधारणा हे विषय त्यांच्या कडून तसे फोल च ठरले . अलीकडील काळातील मात्र डॉ ए पी जे कलाम ह्यांच्या बद्दल कुणाचे हि दुमत असता कामा नये . एक अभ्यासू / शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा हेवा आणि अभिमान तमाम भारतीयांना झाला परंतु असे दुर्मिळ एकमेव उदाहरण ह्या शतकातील मुस्लिम समाजातील ठरावे अर्थात केवळ गरीब कुटुंबातून जन्माला येऊन स्वतःच्या बौद्धिक क्षमतेवर यशाच्या शिखरावर पोहोचता येते हे त्यांनी सर्व जगाला दाखवून दिले आहे ह्याचे आम्ही साक्षी आहोत . परंतु त्यांचे हे उदाहरण अर्थात शिक्षणाची कास आम्ही किती मुस्लिम अनुकरण करत आहोत हे देवचं जाणो ? त्यांच्या बाबतीत कोण्ही विरोध तर सोडाच परंतु भाजप काळात ते राष्ट्रपती पदी विराजमान झाले ते त्यांच्या बॊधिक क्षमतेमुळे . त्यांनी स्वतःला मुस्लिम ऐवजी सर्व प्रथम भारतीय हिंदू असल्याचे सिद्ध केले होते
मुस्लिम ह्यांच्या बद्दल लोकसंख्या वाढी बाबत नेहमीच पोट तिडकीने पहिले जाते . एक मात्र खरे प्रजनन दार मुस्लिमांचा हिंदू पेक्षा अधिक आहे हे मान्य परन्तु गेल्या दशकात मात्र वाढत्या शिक्षणामुळे हा प्रजनन दर बऱ्या पैकी खाली येऊ लागला आहे हे अल्पसंख्याक ह्यांच्या गेल्या २० वर्षातील सर्वेक्षणाने सिद्ध होऊ लागले आहे . गरज आहे समाजाला अधिकधिक शिक्षित करण्याची .
आज राजकारणात आपण जे पाहत आहोत ते कधी कल्पिले न्हवते ….कोणी कोणाशीही युती करून सत्ता हस्तगत करत आहेत तर मग मुस्लिम समाजातील बुद्धिवादी , समाजसेवक ह्यांनी मुस्लिम समाज सुधारणेसाठी स्थानिक संघ शाखेशी जवळीक अर्थात चर्चा सत्रे सुरु केल्यास नवल ते काय ?
म्हणूनच भागवत ह्यांचे मुस्लिम समाज संबंधी असलेले स्पषट विचार हे सुशक्तीत बौद्धिक मंडळी निश्चित स्वीकारतील आणि मुस्लिम समाज प्रगतशील बनविण्या बरोबर हे हिंदू राष्ट्र बनण्यासाठी पुढाकार घेतील असा विश्वास आहे
( लेखक अल्पसंख्याक शैक्षणिक चळवळीचे संस्थापक व अध्यक्ष आहेत )
संपर्क : aslamjamadar1995@gmail.com