सातारा (महेश पवार) :
UWW जागतिक कुस्ती संघटनेच्या व जागतिक बेल्ट रेसलिंग फेडरेशन तसेच सांस्कृतिक, क्रीडा आणि युवा धोरण मंत्रालय किरगीझस्थान यांच्या मान्यतेने “पर्ल ऑफ किरगीझस्थान”- आंतरराष्ट्रीय क्रीडा महोत्सव – 2023,इस्सिक-कुल प्रदेश, किरगिस्तान येथे 16 ते 12जुन रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय बेल्ट रेसलिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याचा सुपुत्र पै.सुधीर पुंडेकर 80+वजन गटात भारतासाठी कास्यपदक जिंकले.
मागील वर्षी एप्रिल 2022 रोजी बिस्केक,किर्गिस्तान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुधीर पुंडेकर यांने 90kg वजन गटात भारत देशाला कांस्यपदकची कमाई करून दिली व 16 मे 2022 रोजी ओश,किर्गिस्तान येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर राहिला.
मुळीकवाडी येथील शेतकरी कुटुंबातील सुधीर पुंडेकर ने सात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवले आहे. 2017 आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंगा अभिमानाने फडकवला आहे.
सुधीरचे राम जन्मभूमी न्यास अयोध्या अध्यक्ष गोंवीद देवगिरी स्वामी,उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,माढा लोकसभा खासदार रंजीतदादा नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी मुक्तार तांबोळी, अमोल साठे यांचे मार्गदर्शन लाभले.