कास पठारवर ‘कोणाच्या’ आशीर्वादाने होतोय बारबालांचा ‘जलवा’?
सातारा (महेश पवार) :
जगप्रसिद्ध कास पठार हे फुलांसाठी प्रसिद्ध आहे, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ते याठिकाणी होत असलेल्या बेकायदेशीर बांधकामांमुळे सारखेच गाजतेय. शनिवारी देखील सातारा पोलीसांच्या कारवाई ने भलत्याच कारणासाठी चर्चेत आलं . कास पठारावरील राज कास हिल रिसॉर्ट मध्ये तोकडे कपडे परिधान केलेल्या मुली व महिलां अश्लील हावभाव करून नाचतायत व त्यांच्यावर हॉटेल मधील कस्टमर पैसे उधळत असताना त्या महिला व मुली त्यांच्या सोबत लगट करून नाचत असल्याची माहिती मिळताच तात्काळ सातारा पोलीसांनी राज हिल रिसॉर्टमध्ये उपस्थित असलेल्या कस्टमर सह २१ जणांच्याविरुद्ध कारवाई केली असल्याचे पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
खरंतर कास पठारावरील बेकायदेशीर हॉटेल चा विषय आज नव्हे तर गेली पाच वर्षांत चांगलाच चर्चेत आला , जिल्हा प्रशासनाने देखील तात्पुरत्या थातुरमातुर कारवाया केल्याने आज कास पठारावर बारबालांचा ‘ नंगा नाच ‘ करण्याची हिंमत कुणामुळे झाली याचा देखील अभ्यास करण्याची गरज आहे.
कास पठारावर असणाऱ्या त्या हॉटेल धारकावर अन्न औषध प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाची चांगलीच मेहरबानी दिसून येते, अनेक हॉटेल व्यावसायिकांकडे लायसन्स नसताना देखील सुरु आहेत . त्याचं बरोबर काही ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री आणि बार ची परमिशन नसताना देखील अनेक हौसे गावशे नवशे खास दारु पिण्यासाठी येतात मात्र त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही . यामुळे भविष्यात कास पठाराची छुम छुम पठार म्हणून ओळखले गेले तर त्यात काय नवल नाही.