Agriculture : पर्यावरणपूरक शेतीसाठी टाटांच्या ‘या’ कंपनीचा पुढाकार
agriculture: टाटा उद्योग आणि भारतीय शेतीसाठी (agriculture) लागणाऱ्या कच्च्या मालाच्या उद्योगक्षेत्रातील आघाडीची कंपनी, रॅलीस इंडिया लिमिटेड नयाझिंकTM सह शेतीच्या पद्धतींचा प्रभाव वाढवत आहे. अनोखे, पेटंटेड झिंक खत मातीमध्ये उपयोगात आणण्यासाठी तयार केले गेले आहे. हे नवीन उत्पादन वेगवेगळ्या पिकांमध्ये, माती प्रकारांमध्ये आणि कृषी हवामानामध्ये शेतीच्या पद्धतींमध्ये बदल घडवून आणत आहे. यामुळे शेतकऱ्यांना झिंक सल्फेटचा अतिशय कुशल पर्याय उपलब्ध झाला आहे.
नयाझिंक™ गुणवत्तेच्या उच्च मानकांसह, संपूर्णपणे एफसीओ-कम्प्लायंट उत्पादन आहे. भारतीय शेतीसाठी (agriculture) पसंती दिला जाणारा पर्याय म्हणून झिंक सल्फेटच्या ऐवजी वापरण्यासाठी हे तयार करण्यात आले आहे. १६% झिंक असलेले हे उत्पादन झिंक सल्फेटच्या तुलनेत फक्त एक दशांश प्रमाणात वापर करून देखील झाडांना सर्वात अनुकूल झिंक पोषण प्रदान करते. ९% मॅग्नेशियम असलेले नयाझिंक™ सुरुवातीच्या विकास टप्प्यामध्ये प्रकाश संश्लेषणाला प्रोत्साहन देते. नयाझिंक™ भात, गहू, मका, ऊस, कडधान्ये, तेलबिया, भाजीपाला, कापूस, ज्वारी, मोहरी; भुईमूग, आणि सोयाबीन यासारख्या विविध प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त, अभिनव सुविधा प्रदान करते.
संजीव लाल, व्यवस्थापकीय संचालक, रॅलीस इंडिया लिमिटेड यांनी नयाझिंक™बद्दल सांगितले,”आमचे मिशन “विज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची (agriculture) सेवा” पूर्ण करण्याप्रती आमच्या समर्पित वृत्तीचे एक द्योतक आहे नयाझिंक™. ४५% पेक्षा जास्त भारतीय मातीमध्ये झिंकची कमतरता आहे. नयाझिंक™ उत्पादन क्षमता वाढवण्यात आणि पर्यावरणपूरकतेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी एक अभिनव उत्पादन आहे. माणसे, खासकरून लहान मुलांमध्ये झिंक पोषणाप्रमाणेच झाडांवर देखील झिंक पोषणाचा खूप परिणाम होतो. निरोगी मातीसाठी एक मजबूत आधार पुरवण्याच्या, राष्ट्राला निरोगी बनवण्यासाठी निरोगी भोजनाचे उत्पादन करण्याच्या उद्देशाने आम्ही या उत्पादनामध्ये गुंतवणूक केली आहे.”
एस नागराजन, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, रॅलीस इंडिया लिमिटेड यांनी सांगितले,”मातीमध्ये हानिकारक प्रतिक्रिया होण्यापासून रोखण्यासाठी पॉलीफॉस्फेट शृंखलेमध्ये नाजूकपणे बांधलेल्या झिंकच्या सिद्धांतानुसार निर्मित, हे नाविन्यपूर्ण मायक्रोन्यूट्रियंट खत कोणत्याही पीक पोषक स्रोतासह वापरले जाऊ शकते आणि पारंपरिक झिंक सल्फेटच्या तुलनेत हे अनेक वेळा उपयोग कार्यक्षमतेमध्ये सुधारणा करण्यासाठी धीम्या गतीने बाहेर पडणाऱ्या खताप्रमाणे कार्य करते. नयाझिंकTM पीक पोषक तत्त्व उपयोगामध्ये एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
रॅलीस इंडिया लिमिटेड कंपनीला विश्वास आहे की नयाझिंक™ पर्यावरणपूरक शेती (agriculture) पद्धतींच्या नवीन युगाची सुरुवात करेल ज्याचा भविष्यात शेतकरी आणि पर्यावरण दोघांनाही फायदा होईल.