…अखेर ‘वंचित’ आणि ‘ महविकास आघाडी’ आले एकत्र
महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट करून घेण्यात आलं आहे. आज ३० जानेवारी रोजी मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महाविकास आघाडीने अधिकृत पत्रक जारी करून वंचितला महाविकास आघाडीत सामील करून घेतल्याचं जाहीर केलं. या पत्रकावर नाना पटोले, संजय राऊत आणि जयंत पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
महाविकास आघाडीने आज बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती यांनी दिली. तसंच, वंचित बहुजन आघाडीसह अनेक राजकीय पक्षांना महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यात आलं असून महाविकास आघाडीचा विस्तार झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिली. तर, २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर सहभागी होणार असल्याचंही संजय राऊत म्हणाले. यावर प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
प्रकाश आबंडेकर म्हणाले, “महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष यांचा अपमान झाला. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्याबाबतच्या पत्रात नाना पटोलेंना सही करण्याचा अधिकार आहे की नाही हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी किंवा रमेश चेन्नथीलाल यांनी स्पष्ट केलं नसलं तरीही आम्ही महाविकास आघाडीच्या पुढच्या बैठकीत सहभागी होणार आहोत. कारण, भाजपा-आरएसएस विरोधात लढणं ही आमची प्राथमिकता आहे.”
Even though VBA’s State Vice-President was not given due respect in the MVA meeting and VBA is not aware nor informed by AICC or by Ramesh Chennithala whether Nana Patole is having any authority to sign any letters for including VBA in MVA alliance, we will join MVA in the next…
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) January 30, 2024