देश/जगमहाराष्ट्र
उदयनराजे आणि सातारकर चाकरमानी; सगळेच तिकिटासाठी झाले हवालदिल…
सातारा (महेश पवार):
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील लोकसभेचे तिकीट वाटपावरून राजकारण तापले असताना कामानिमित्त पुण्यामध्ये गेलेल्या साताऱ्यातील नागरिकांना देखील गावी येण्यासाठी दोन दोन तास उभे राहून देखील गाडी नसल्याने तिकीट मिळत नाही. तर दुसरीकडे गेले तीन दिवस झाले लोकसभेचे तिकीट मिळावे म्हणुन उदयनराजे दिल्लीत तळ ठोकून आहेत. यामुळे उदयनराजे आणि नोकरीसाठी बाहेर गेलेल्या साताऱ्यातील चाकरमान्यांची एकच अवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे…
पहा व्हिडीओ: