निष्क्रिय आमदाराला हटवण्यासाठी सगळे प्रयत्न करणार: धैर्यशील कदम
सातारा (महेश पवार):
सातारा विधानसभेला महायुतीने आठ जागांपैकी भाजपला चार राष्ट्रवादीला दोन तर शिवसेनेला दोन जागा वाटून घेतल्या ,
भाजपकडून पहिल्या यादीमध्ये 99 उमेदवारांची यादी जाहीर केली यामध्ये साताऱ्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले तर माण- खटाव चे आमदार जयकुमार गोरे तसेच कराड दक्षिण मधून अतुल भोसले यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहेत.
कराड उत्तर ची जागा ही भाजपला दिली गेली असून यांची घोषणा लवकरच होईल, 2009पासुन चालु असलेल्या कारकीर्दीत राज्य आणि केंद्र सरकारच्या जनतेमध्ये पोहचलेल्या योजना, लोकांची केलेली कामं आणि मिळवलेले जनतेचे प्रेम यावरून कराड उत्तर मधून पात्र उमेदवार आहात म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मा.बावनकुळे यांच्या सोबत झालेल्या बैठकी दरम्यान धैर्यशील कदम यांना कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून संधी देण्याचे आश्वासन दिले आहे.
कराड उत्तर मतदारसंघातून मागील निवडणुकीदरम्यान कळत नकळत एकमेंकाविरोधात लढल्यामुळे विद्यमान आमदारांना फायदा झाला परंतु या निवडणुकीत आम्ही एकत्र असुन पक्षानं मला संधी दिली तर मनोज घोरपडे माझ्या पाठीशी उभं राहून भाजपची जागा निवडून आणण्यासाठी मोठ्या ताकदीने प्रयत्न करतील, मनोज घोरपडेना जरी तिकीट मिळालं नाही तरी त्यांना पक्षाकडून मोठ्या जबाबदारी चे पद देतील याबद्दल मला खात्री आहे.
कराड उत्तर मतदारसंघातून लढताना भाजपची जागा निवडून आणण्यासाठी आम्ही दोघेही एकत्र असुन आमचं टारगेट ठरलेलं आहे गेली 25वर्ष एकच व्यक्ती त्या ठिकाणी आमदार म्हणून काम करते ती अतिशय बिनकामाची आणि निष्क्रिय असा शिक्का बसलेली ही व्यक्ती आहे .मी धेर्यशील कदम ,रामकृष्ण वेताळ,मनोज घोरपडे आमचं ठरलंय निष्क्रिय आमदार हाच आमचा दुश्मन आहे त्याला हलविण्यासाठी आम्ही सर्व एकत्र असल्याचे धेर्यशील कदम यांनी पत्रकारांशी बोलताना वक्तव्य केले आहे.