google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

फटाक्यांपासून सावधगिरी बाळगा : प्रभव नायक

मडगाव :

हैदराबादमधील एबिड्स मार्केट आणि केरळमधील कासरगोड येथे फटाक्यांमुळे गेल्या 2 दिवसात लागलेल्या भिषण आगीच्या घटनांत अनेक जण जखमी झाल्याचे व्हिडिओ भयावह आहेत. दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. मी सर्वांना नम्रपणे आवाहन करतो की फटाके साठवताना आणि फोडताना अत्यंत काळजी घ्यावी. नागरिकांच्या सुरक्षेची योग्य काळजी घेण्यासाठी सरकारने योग्य पाऊले उचलणे गरजेचे आहे, असे युवा नेते प्रभव नायक यांनी म्हटले आहे.

आपल्या समाजमाध्यमांवरील पोस्टवरुन, प्रभाव नायक यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख असलेल्या गोव्याच्या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना टॅग करुन कोणतीही घटना हाताळण्यासाठी विस्तृत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची त्यांच्याकडे मागणी केली आहे.

मडगाव नगरपालीका मार्केट आणि आजूबाजूला योग्य अग्निशमन उपकरणे नसल्याची मला पूर्ण जाणीव आहे. गोव्यातील इतर बाजारपेठांमध्ये परिस्थिती तशीच आहे. आपल्या सुरक्षेची काळजी घेणे आता फक्त लोकांच्याच हातात आहे, असे प्रभव नायक म्हणाले.

गोव्यातील अग्निशमन आणि आपत्कालीन सेवेलाही अनेक मर्यादा आहेत. गोव्यात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा ढिसाळपणा आपण अनेकवेळा पाहिला आहे. त्यामुळे गोमंतकीयांनाच स्वताच्या सुरक्षिततेवर भर द्यावा लागेल, असे प्रभव नायक यांनी सांगितले.

हैदराबादमधील एबिड्स मार्केट आणि केरळमधील कासरगोड येथील मंदिर प्राकारात लागलेल्या आगीच्या घटना आपल्या सर्वांसाठी चिंतेचे कारण आहेत. नागरिकांना सतर्क करणे हे माझे कर्तव्य आहे आणि म्हणूनच मी माझ्या सोशल मीडिया हँडलवर सदर घटनांचे व्हिडिओ पोस्ट करण्याचा निर्णय घेतला, असे प्रभव नायक म्हणाले.

प्रत्येकाने सुरक्षिततेची खबरदारी घेऊन आणि योग्य ती काळजी घेऊन दिव्यांचा उत्सव साजरा करावा अशी मडगावच्या आवाजाची इच्छा आहे. दिवाळी साजरी करताना आपण सर्वांनी आपल्या मुलांवर बारीक लक्ष ठेवूया. आपण सर्व मिळून उत्सवाचा आनंद लुटूया, असे प्रभव नायक म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!