अॅड. पालेकर यांनी कॅप्टन विरिआतो फर्नांडिस यांना फटकारले
पणजी:
आम आदमी पार्टीचे गोवा अध्यक्ष अॅड. अमित पालेकर यांचा ‘फोर्जरी मास्टर’ या उपाधीने उल्लेख केल्याबद्दल अमित पालेकर यांनी गुरुवारी काँग्रेस नेते कॅप्टन विरिआतो फर्नांडिस यांना फटकारले. फर्नांडिस यांनी असे उलट सुलट विधान करण्यापूर्वी अभ्यास करावा असा सल्ला पालेकर यांनी दिला.
फर्नांडिस यांनी 13 ऑगस्ट 2019 रोजीचा श्रीमती ओथेलिया मस्करेन्हास यांचा एक दस्तऐवज सादर करून तो दस्तऐवज पालेकर यांनी तयार केल्याचा दावा केला. पालेकर यांच्या कारकिर्दीवर, व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनावर नकारात्मक परिणाम होईल अशी टिप्पणी केल्याबद्दल पालेकर यांनी फर्नांडिस यांना खडसावले.
पालेकर म्हणाले, “पोलिसांनी आधीच आरोपी, दस्तऐवज तयार करण्यासाठी जबाबदार असलेला वकील आणि दस्तऐवज संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत”.
याशिवाय पालेकर यांनी फर्नांडिस यांच्या आरोपाप्रमाणे पालेकर हे ‘फोर्जरी मास्टर’ असल्याचे फर्नांडिस यांनी सिद्ध करू दाखवल्यास स्वतः चा व्यवसाय सोडण्याचे संकेत पालेकर यांनी दिले. फर्नांडिस तसे करू शकले नाहीत तर त्यांनी ‘कॅप्टन’ टायटल सोडावे, असे पालेकर म्हणाले.
बेकायदेशीरपणे जमीन बळकावण्याच्या आणि धर्मांतराच्या प्रकरणांत काँग्रेसच्या आमदाराचे नाव पुढे आले आहे. काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्या खऱ्या घोटाळेबाजांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी फर्नांडिस अशी विधाने करत असल्याचा दावा पालेकर यांनी केला.