
गाझियाबादवरून एअर इंडिया एक्सप्रेस जोडणार आता गोवा, बेंगळुरू, आणि कोलकात्याला…
एअर इंडिया एक्सप्रेसने NCR मध्ये आपले नेटवर्क विस्तारित करत आहे. याअंतर्गत हिंडन विमानतळ बेंगळुरू, गोवा आणि कोलकाता यांना जोडणारी 28 थेट साप्ताहिक उड्डाणे चालवत NCR आणि उत्तर भारतातील प्रवाशांना अधिक सुविधा देण्याचा कंपनीचा विचार आहे. यासाठी ₹5,134 पासून तिकिटाचे दर आहेत. 1 ऑगस्ट 2024 पासून ही उड्डाणे सुरू होतील. यासाठी तुम्ही एअरलाईन्सची पुरस्कारप्राप्त वेबसाइट, airindiaexpress.com, एअर इंडिया एक्सप्रेस मोबाइल ॲप आणि इतर प्रमुख बुकिंग चॅनेलवरून तिकीट बुक करू शकता.
नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (IGI) आठवड्याला 280 पेक्षा जास्त उड्डाणांसोबतच, AIX हिंडन विमानतळावरून पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हरियाणातील इतर शहरांमध्येही उड्डाण करेल. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये (NCR) हिंडनचे स्थान अत्यंत मोक्याचे आहे. त्यामुळेच मध्य आणि पूर्व दिल्ली, नोएडा, अलीपूर, आग्रा, बागपत, बुलंदशहर, दादरी, डासना, डेहराडून, फरीदनगर, हापूर, हरिद्वार, खेकरा, लोणी, मेरठ, मोदीनगर, मुरादनगर, नोएडा, नांगलोई जाट, पिलखुवा, पानिपत, ऋषिकेश, सहारनपूर आणि सोनीपत, इथे येणे जाणे सोयीचे होणार आहे.
या घडामोडींबाबत एअर इंडिया एक्स्प्रेसचे व्यवस्थापकीय संचालक अलोक सिंग म्हणाले, “झपाट्याने वाढणाऱ्या देशांतर्गत आणि कमी अंतराच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर सध्या आमचे लक्ष आहे, विशेषत: नवीन आणि जिथे फार सेवा नाहीत, अशा ठिकाणी आम्ही जास्त लक्ष केंद्रित करणार आहोत. भारतातील प्रमुख मेट्रोपॉलिटन क्षेत्रे दुय्यम विमानतळांना मदत करू शकतात, ज्यामुळे हवाई कनेक्टिव्हिटीचा फायदा होतोच पण विस्ताराला देखील प्रोत्साहन मिळते. हिंडन येथून उड्डाणे सुरू करणे हा या दृष्टीने केलेला आमचा एक प्रयत्न आहे, यावर आमचा विश्वास आहे. दिल्ली एनसीआरच्या पलीकडे पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल आणि हरियाणा येथील प्रवाशांना या उड्डाणाचा फायदा होईल. ही ऑपरेशन्स आमच्या सेवांना पूरक ठरतील, सोयीस्कर पर्याय देतील.
एअर इंडिया एक्सप्रेस बेंगळुरूहून दररोज दोन थेट उड्डाणे आणि कोलकाता तसेच गोवा येथून हिंडन, दिल्ली एनसीआरसाठी दररोज प्रत्येकी एक थेट उड्डाण करेल. या शहरांमधून मध्य, उत्तर आणि पूर्व दिल्ली, तसेच राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील इतर स्थळे, तसेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि हरियाणामधील अनेक पर्यटन आणि धार्मिक स्थळांना जाणाऱ्या पाहुण्यांची सोया होईल. यामुळे NCR मधील वाहतूक कोंडी कमी होईल.
From | To | Dep | Arr | Freq | Start Date |
Bengaluru | Hindon | 05:10 | 08:00 | Daily | 01-08-2024 |
Hindon | Bengaluru | 08:30 | 11:20 | Daily | 01-08-2024 |
Bengaluru | Hindon | 11:55 | 14:45 | Daily | 01-08-2024 |
Hindon | Bengaluru | 15:15 | 18:05 | Daily | 01-08-2024 |
From | To | Dep | Arr | Freq | Start Date |
Kolkata | Hindon | 07:10 | 09:30 | Daily | 15-08-2024 |
Hindon | Goa | 10:00 | 12:45 | Daily | 15-08-2024 |
Goa | Hindon | 13:15 | 15:55 | Daily | 15-08-2024 |
Hindon | Kolkata | 16:25 | 18:45 | Daily | 15-08-2024 |
बेंगळुरू, गोवा आणि कोलकाता यांसारख्या लोकप्रिय ठिकाणांना नॉन-स्टॉप कनेक्टिव्हिटी देण्यासोबतच, एअर इंडिया एक्सप्रेस हिंडनला वन-स्टॉप डेस्टिनेशन म्हणून विकसित करेल. यामुळे हिंडन हे भुवनेश्वर, चेन्नई, कालिकत, कन्नूर, कोची यांच्या मार्गावरील हैदराबाद, इंफाळ, बागडोगरा, मंगलोर, मुंबई, पुणे, आणि तिरुवनंतपुरम या प्रमुख स्थानकांशी जोडले जाईल.
एअरलाइनच्या वेबसाइटवर आणि मोबाइल ॲपवर बुकिंग करणाऱ्या लॉयल्टी सदस्यांना विशेष सवलत आणि लाभ मिळतील. 8% पर्यंत NeuCoins आणि मानार्थ Xpress Ahead प्राधान्य चेक-इन, बोर्डिंग आणि बॅगेज सेवांसह अतिरिक्त फायदे मिळतील. लॉयल्टी सदस्यांव्यतिरिक्त, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, SME, आश्रित आणि भारतीय सशस्त्र दलाचे सदस्य देखील airindiaexpress.com वर सवलतीचे दर आणि फायदे मिळवू शकतात.
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेले हिंडन विमानतळ हे गजबजलेल्या राष्ट्रीय राजधानीसाठी (NCR) दुय्यम महत्त्वाचे विमानतळ म्हणून काम करते. कनेक्टिव्हिटीसाठी हिंडन विमानतळ हे भारतातील टियर-2 आणि टियर-3 शहरांसाठी एक प्रमुख प्रवेशद्वार आहे. शिवाय, हिंडन विमानतळ प्रमुख मार्गांद्वारे त्याच्या धोरणात्मक प्रवेशयोग्यतेमुळे फ्लायर्ससाठी आकर्षक मूल्य प्रस्ताव सादर करतो आणि सार्वजनिक वाहतूक प्रवाशांसाठी घर्षणरहित कनेक्टिव्हिटी सुलभ करून त्याचे आकर्षण वाढवते.