google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

आणि आता सुरू झाला… ‘हॅपीनेस अपग्रेड डे’

बंगळुरू :

महिनाभर चालणाऱ्या उत्सवाचा एक भाग म्हणून, 23 सप्टेंबरपासून सुरू झालेला अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल (एजीआयएफ) हा उत्सव सुरू ठेवला आणि Amazon.in ने आज इंटेल इवो द्वारे समर्थित ‘हॅपीनेस अपग्रेड डेज’ची घोषणा केली. 4 ऑक्टोबर 2022 पासून 8 ऑक्टोबर पर्यंत, ग्राहकांना विविध श्रेणींमध्ये उत्पादनांवर अतिरिक्त बचत मिळेल. द ग्रेट इंडियन फेस्टिव्हल – ‘हॅपीनेस अपग्रेड डेज’ विक्रेते आणि ब्रँड्सकडून स्मार्टफोन, मोठी उपकरणे आणि लॅपटॉप, टीव्ही, घर आणि स्वयंपाकघरातील उत्पादने, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि सौंदर्य, दैनंदिन आवश्यक वस्तू आणि बरेच काही यावर विशेष डील आणि ऑफर घेवून आले आहे. ग्राहकांना इंटेल इवो, आयक्यू, मायक्रोसॉफ्ट, ममी पोको, फरेरो, झिऑमी, पी ॲंड जी, कोलगेट आणि गोदरेज मधील उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीवर विशेष ऑफर मिळतील.

अॅमेझॉन पे सह सणासुदीची खरेदी अधिक फायद्याची ठरली: एजीआयएफ दरम्यान खरेदी करणारे ग्राहक ईएमआय व्यवहारांसह सिटीबॅंक, आरबीएल, वन कार्ड आणि रूपे क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10% झटपट सूट देऊन अधिक बचत करू शकतात. अग्रगण्य क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बजाज फिनसर्व्ह आणि अॅमेझॉन पे लॅटरवर उपलब्ध नो कॉस्ट ईएमआयचाही त्यांना फायदा होऊ शकतो. डिजिटल गोल्डच्या खरेदीवर 1000 रुपयांपर्यंत परत आणि गिफ्ट कार्डच्या खरेदीवर 10% कॅशबॅकसह ग्राहक सणाच्या अधिक ऑफरचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय, सणासुदीची खरेदी सुलभ आणि अधिक फायद्याची बनवण्यासाठी, अॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डसाठी अर्ज करणार्‍या ग्राहकांना स्वागत ऑफर म्हणून 2,500 रुपयां पर्यंत बक्षिसे मिळू शकतील* आणि अॅमेझॉन पे लॅडर (पहिल्यांदा) निवडणाऱ्या ग्राहकांना 600 रुपयांपासून तर 60,000 रुपयांपर्यंत झटपट क्रेडिट (आधारभूत पात्रता) पर्यंत रिवार्ड मिळेल. डिजिटल गोल्डच्या खरेदीवर 1000 रुपयांपर्यंत परत आणि गिफ्ट कार्डच्या खरेदीवर 10% कॅशबॅकसह ग्राहक अतिरिक्त सणाच्या ऑफरचा आनंद घेऊ शकतात.

टॉप ब्रँड्स व्यतिरिक्त, ‘हॅपीनेस अपग्रेड डेज’ ग्राहकांना अॅमेझॉन लाँचपॅड, लोकल शॉप्स, अॅमेझॉन सहेली, अॅमेझॉन कारीगर यांसारख्या विविध कार्यक्रमांतर्गत लाखो छोटे व्यवसायी आणि हजारो अॅमेझॉन विक्रेत्यांकडून अनन्य उत्पादनांची खरेदी करण्याची आणि याद्वारे विस्तारित डील आणि ऑफरचा आनंद घेण्याची संधी देखील देईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!