…आता विषय संपला : बच्चू कडू
अमरावती (अभयकुमार देशमुख) :
राणा आणि कडू यांचा वाद आता संपला आहे. बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राणा यांनी माफी मागितली आम्ही आनंद व्यक्त करतो.आम्हाला विनाकारण जास्त हातपाय हलवावे लागले असते.आपण जो काही मोठेपणा दाखवला, आणि चूक लक्षात आली, त्याची माफी मागितली, त्याबद्द्ल खरतर पुन्हा एकदा आभार मानतो.
तुम्ही दोन पाऊल माघार घेतली आम्ही चार पावले माघार घेतो. आम्हाला विनाकारण ऊर्जा खतम करायची नाही आहे. चांगल्या कामात ऊर्जा लावायची आहे या सगळ्या आंदोलनामध्ये सात दिवसात सुप्रियाताई सुळे राजू शेट्टी गुलाबराव पाटील यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्यासाठी त्यांचेही बच्चू कडूंनी आभार मानले. यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी मध्यस्थी केली त्यासाठी त्यांचे देखील आमदार बच्चू कडू यांनी आभार मानलेत.
काही वाद न पेटलेले बरे असतात . आता आपल्याला खऱ्या मुद्द्यांवर काम करायची गरज आहे असं देखील प्रकारच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना बच्चू कडू यांनी सांगितला आहे.यावेळी बच्चू कडूंना त्यांचे गुरु पुरुषोत्तम राव तायडे यांनी जो मेसेज पाठवला त्याचा उल्लेख करत आ राणा दोन पावले मागे आले तुम्ही सुद्धा एक पाऊल मागे यावं व ही ऊर्जा चांगल्या कामासाठी खर्च करावी असा संदेश दिला. या मेसेजचा बच्चू कडूंनी रात्रभर विचार केला असा उल्लेख केला.आणि अशाच काहीशा भावना कार्यकर्त्यांसह सर्वांनी व्यक्त केल्या होत्या. आज माझा अपमान झाला मात्र आम्हाला सामान्य माणसाचा अपमान होऊ द्यायचा नाही ही सगळी ऊर्जा सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी खर्च करायची आहे असे सांगत बच्चू कडू यांनी रवी राणा यांनी खोके प्रकरणात केलेल्या आरोपंवार पडदा टाकला आहे