google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

एयर इंडिया आणि लुफ्तान्सा ग्रुपतर्फे कोडशेअर भागिदारीचा विस्तार


एयर इंडिया आणि लुफ्तान्सा ग्रुपने त्यांची दीर्घकाळापासून सुरू असलेली कोडशेयर भागिदारी विस्तारण्याचे ठरवले असून त्याअंतर्गत एयर इंडिया, ऑस्ट्रियन एयरलाइन्ससह नवीन कोडशेयर करार करणार असून त्याचबरोबर एयर इंडिया, लुफ्तान्सा आणि स्विस इंटरनॅशनल एयर लाइन्स (स्विस) यांच्याह सध्या असलेल्या कोडशेयर कराराचा विस्तार केला जाणार आहे.
या विस्तारित भागिदारीमुळे भारतीय उपखंड आणि युरोपदरम्यानचे विमानसेवेचे पर्याय व कनेक्टिव्हिटी वाढणार असून या चार विमानकंपन्यांद्वारे १२ भारतीय शहरे आणि २६ युरोपीय शहरांदरम्यान अतिरिक्त ६० कोडशेयर मार्ग उपलब्ध होणार आहेत.
विस्तारित करारामुळे एयर इंडिया, लुफ्तान्सा आणि स्विस यांच्यातील कोडशेयर मार्गांची संख्या ५५ वरून १०० वर जाणार आहे. त्याशिवाय एयर इंडिया आणि ऑस्ट्रियन एयरलाइन्सदरम्यान २६ कोडशेयर मार्गांसाठी नवीन करार केला जाणार आहे. यामुळे दोन्ही भागातील प्रवाशांना जास्त पर्याय मिळतील, सोयीस्करपणा वाढेल आणि त्यांना चांगली सेवाही मिळेल.


एयर इंडियाद्वारे ग्राहकांना युरोप आणि अमेरिकेतील तीन ठिकाणी, युरोपमधील काही ठिकाणांपलीकडे (फ्रँकफर्ट, व्हिएन्ना आणि झुरिच) येथे एकूण २६ ठिकाणी सेवा मिळेल. लुफ्तान्सा ग्रुप आणि ऑस्ट्रियन एयरलाइन्स पहिल्यांदाच त्यांच्या सेवेसाठी ‘AI’ डेझिग्नेटर कोड वापरतील.


लुफ्तान्सा
फ्रँकफर्ट आणि – अमस्टरडॅम, बार्सिलोना, बर्लिन, ब्रेमेन, ब्रुसेल्स, कोपनहेगन, ड्रेस्डेन, डसेलडॉर्फ, डब्लिन, जिनिव्हा, हॅम्बर्ग, हॅनोव्हर, लक्झेंबर्ग, ल्योन, मँचेस्टर, मार्सेली, म्युनिक, नाइस, न्युरेमबर्ग, ओस्लो, प्राग, रीगा, रिओ डी जनेरो, पॉलटोलॉस, स्टॉकहोल्मो, साउथ, रीगा. व्हॅलेन्सिया, – वॉशिंग्टन डी.सी.


स्विस
झुरिच आणि : अमस्टरडॅम, बार्सिलोना, बर्लिन, ब्रेमेन, ब्रुसेल्स, कोपनहेगन, ड्रेसडेन, डसेलडॉर्फ, डब्लिन, जिनिव्हा, हॅम्बर्ग, हॅनोव्हर, लक्झेंबर्ग, मँचेस्टर, मार्सिले, म्युनिक, नाइस, ओस्लो, प्राग, स्टॉकहोम, स्टुटगार्ट, वॅलेन्शिया.


ऑस्ट्रियन एअरलाइन्स
व्हिएन्ना आणि दरम्यान: अमस्टरडॅम, बार्सिलोना, बर्लिन, ब्रेमेन, ब्रसेल्स, कोपनहेगन, डसेलडॉर्फ, जिनेव्हा, हॅम्बर्ग, हॅनोव्हर, ल्योन, मँचेस्टर, मार्सेली, म्युनिक, नाइस, ओस्लो, प्राग, स्टॉकहोम, स्टुटगार्ट, व्हॅलेन्सिया.


दुसरीकडे लुफ्तान्सा ग्रुपच्या ग्राहकांना एयर इंडियाची देशांतर्गत सेवा किंवा भारतातील १५ ठिकाणच्या सेवेचा लाभ घेता येणार असून त्यात अहमदाबाद, अमृतसर, बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, दिल्ली, गोवा मोपा, गोवा दाबोलिम, हैदराबाद, इंदूर, कोची, कोलकाता, मुंबई, पुणे आणि तिरुवनंतपुरम यांचा समावेश असेल. लुफ्तान्सा ग्रुपने त्यांचे डेझिग्नेटर कोड्स एयर इंडियाद्वारे दिल्ली आणि मुंबईपासून काठमांडू, मेलबर्न आणि सिडनी या तीन आंतरराष्ट्रीय सेवांसाठी समाविष्ट केले जाते.


एयर इंडिया आणि लुफ्तान्सा ग्रुपद्वारे सध्या भारत आणि जर्मनी आणि स्वित्झर्लंडदरम्यान चालवल्या जाणाऱ्या विमानसेवा विस्तारित कोडशेयर भागिदारीअंतर्गत कव्हर केल्या जातील. उदा. ज्या ग्राहकांना दिल्ली ते फ्रँकफर्ट प्रवास करायचा आहे, त्यांना प्रत्येक मार्गावर ‘LH’ फ्लाइट क्रमांकासह तीन दैनंदिन विमानसेवांचा पर्याय मिळेल व त्यात एयर इंडियाद्वारे चालवल्या जाणाऱ्या दोन फ्लाइट्स, तर लुफ्तान्साद्वारे चालवल्या जाणाऱ्या एका फ्लाइटचा समावेश असेल.


दोन्ही एयरलाइन्सनी टप्प्याटप्प्याने त्यांच्या नेटवर्कमधील इतर ठिकाणांचा कोडशेयर करारामध्ये समावेश करण्याचे ठरवले आहे. एयर इंडिया आणि तीन लुफ्तान्सा ग्रुप कॅरियर्स स्टार अलायन्सचे सदस्य आहेत. फ्रीक्वेन्ट फ्लायर्सना चारही एयरलाइन्सवर पॉइंट्स/माइल्स रिडीम करता येतील, तर एलाइट स्टेटस होल्डर्सना एयर इंडियाच्या महाराजा क्लब आणि लुफ्तान्सा ग्रुपच्या माइल्स अँड मोअर प्रोग्रॅम्समुळे स्टार अलायन्सच्या गोल्ड बेनिफिट्सचा लाभ होईल. त्यात प्रायोरिटी सेवा, अतिरिक्त बॅगेज अलावन्स आणि जगभरात एयरपोर्ट लाउंज अक्सेस यांचा समावेश असेल.
‘जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून ग्राहकांना एयर इंडिया आणि कंपनीच्या पार्टनर एयरलाइन्सद्वारे प्रवास करता यावा हे आमचे ध्येय आहे. लुफ्तान्सा ग्रुपसह करण्यात आलेली भागिदारी त्याच दिशेने टाकलेले पाऊल आहे आणि ही दीर्घकालीन भागिदारी पुढील टप्प्यावर नेण्याचे आमचे ध्येय आहे,’ असे एयर इंडियाचे चीफ कमर्शियल ऑफिसर निपुण अगरवाल म्हणाले.


या नव्याने करण्यात आलेल्या भागिदारीमुळे आमच्या ग्राहकांना अजून जास्त ठिकाणी सहजपणे प्रवास करता येईल आणि लुफ्तान्सा ग्रुप कॅरियरद्वारे युरोपमध्ये सहजपणे प्रवास करता येईल. यामुळे लुफ्तान्सा ग्रुपच्या ग्राहकांना सेवा देण्याची व पर्यायाने त्यांना भारतीय पाहुणचाराचा अनुभव देण्याची संधीही आम्हाला मिळणार आहे. आम्ही आमच्या स्टार अलायन्स पार्टनर्ससह काम सुरू ठेवत जग आणखी जवळ आणण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही अगरवाल म्हणाले.
एयर इंडियासह भागिदारी मजबूत करत ग्राहकांसाठी प्रवासाचा अनुभव आणखी उंचावताना आम्हाला आनंद होत आहे. सेवेचा आणखी विस्तार करून आम्ही युरोप व भारतादरम्यानच्या प्रवासाचे पर्याय आणखी वाढवत आहोत. त्याचप्रमाणे अतिरिक्त ठिकाणी सेवा दिली जाणार आहे. लुफ्तान्सा ग्रुप भारताप्रती बांधील आहे आणि या देशातील विस्ताराच्या शक्यता आणि एयर इंडियासह करण्यात आलेल्या भागिदारीविषयी आम्ही उत्सुक आहोत,’ असे लुफ्तान्सा ग्रुपचे चीफ कमर्शियल अधिकारी डिएटर व्हँऱ्क्स म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!