‘फिल्म बाझार’मध्ये गाजली आगळी वेगळी ‘मूक रामलीला’
रामलीला या प्रकाराबद्दल प्रत्येकाने ऐकले आणि काहींनी तर पाहिले पण असेल. परंतु मूक रामलीलेबाबत क्वचितच कुणी ऐकले असेल. मूक रामलीला हा तसा भरपूर जुना प्रकार असून शस्त्रविद्या शिकविण्याच्या माध्यमातून मूक रामलीलेचा जन्म झाला. राजस्थानातील बिसाऊ या गावात मागील ८० वर्षापासून मूक रामलीलाची परंपरा टिकवून ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या फिल्म बाझारमध्ये ज्येष्ठ माहितीपट निर्माते रजनी आचार्य यांनी निर्माण केलेल्या या मूक रामलीलेवरील विशेष माहितीपटाने उपस्थितांची वाहवा मिळवली.
बिसाऊ येथील मूक रामलीला ही जगप्रसिद्ध आहे. शारदीय नवरात्रात रामलीलाला सुरूवात होते व॒ १५ दिवस ही रामलीला सादर केली जाते. राजस्थानातील बिसाऊ गावात मूक रामलीला मागील ८० वर्षापासून सादर केली जात आहे. गावातील लोकसुद्धा रामलीला करतात. ही मूक रामलीला इतर रामलीलासारखीच दिसत असली तरी यात पात्रांचा संवाद नसतो, त्यामुळे ती सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. विशेष म्हणजे जो लहानपणी रामची भूमिका करतो तो मोठेपणी रावणाची भूमिका करतो. ही परंपरा आजपर्यंत सुरू आहे.
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीदरम्यान काही स्वातंत्र्यैनिक या गावात लपले होते. ज्यात एक महिला होती त्यांनी गावातील मुलांना शस्त्रविद्या शिकविण्यासाठी मूक रामलीलाचे आयोजन केले. भारतीय लोककला, संस्कृती, परंपरा समाजापर्यंत पोहचविण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. या रामलीलामध्ये कुठल्याही प्रकारचे संवाद नसतात. हावभावातून ही रामलीला लोकांपर्यंत पोहोचविली जाते अशी माहिती रजनी आचार्य यांनी दिली.
यासाठी चित्रपट तयार केला आहे. असे रजनी आचार्य सांगतात.