google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

डायलॉग शाहरुखचा; पण ट्रोल होताहेत समीर वानखेडे…

Shah Rukh Khan-Sameer Wankhede Jawan Trailer : अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूकमध्ये दिसत आहे.  तसेच या ट्रेलरमधील डायलॉग  आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रीलिज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. ट्रेलर जवानचा, मात्र ट्विटवर चर्चा ही शाहरुख खानची नाही तर समीर वानखेडेची रंगली आहे. हा ट्रेलर रिलिज होताच चाहते चित्रपटातील डायलॉगला समीर वानखेडेंसोबत जोडत आहेत.

‘जवान’चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?

त्याला कारण ठरला तो ट्रेलरमधील एक खतरनाक डायलॉग. ज्यामध्ये शाहरुख त्याच्या स्टाईलमध्ये म्हणतो की, ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर…’. आता ट्विटवर हा डायलॉग खूपच चर्चेत आहे. नेटकऱ्यांनी हा संवाद मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याशी जोडला.

या ट्रेलरमध्ये एकीकडे शाहरुखने मेट्रो हायजॅक केल्याचं दाखवलं आहे, तर दुसरीकडे नयनतारा पोलीस अधिकारीच्या भूमिकेत आहे. तिच्या हातात हायजॅकची केस सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ट्रेलरमध्ये आलिया भट्टशी संबंधित मजेशीर डायलॉगसुद्धा आहे. तर आणखी एका सीनमध्ये शाहरुख एका सैनिकाच्या भूमिकेत पहायला मिळतोय. तर विजय सेतुपती हा खलनायक साकारतोय. सान्या मल्होत्रा, प्रियामणी, रिधी डोग्रा, सुनील ग्रोवर यांसारख्या इतर कलाकारांचीही झलक ट्रेलरमध्ये पहायला मिळतेय.

शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे ‘जवान’कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अटलीने हिंदी फिल्म इंडस्ट्रीत पहिलं पाऊल ठेवलं आहे. जवान या चित्रपटाची निर्मिती शाहरुखची पत्नी गौरी खान आणि रेड चिलीज एंटरटेन्मेंटने केली आहे. येत्या 7 सप्टेंबर रोजी हा बहुप्रतिक्षित चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!