google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

‘कांतारा चॅप्टर १’ ची पहिली झलक पाहिली का?

“कांतारा: ए लीजंड” ने गत वर्षी आश्चर्यकारक कामगिरी केली आणि आता होम्बले फिल्म्स “कांतारा चॅप्टर १” या आणखी एका जबरदस्त चित्रपटासह पुन्हा रसिकांच्या भेटीला येत आहे. त्यांनी अलीकडेच या चित्रपटाची झलक प्रदर्शित केली. त्यावरून लक्षात येते की, हा चित्रपट खूपच चित्तथरारक आणि खास असणार आहे.


अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचे एक अशुभ, मात्र वेधक रूप दाखवणाऱ्या या ‘टीझर’मधून दिग्दर्शकाने स्वतःसाठी निर्माण केलेल्या दूरदर्शी जगाची झलक दिसून येते. यासह, पहिल्यांदा प्रतिध्वनित झालेली परिचित गर्जना पुन्हा एकवार ऐकू यायला लागली आहे, जी एका आख्यायिकेच्या जन्माची आणि या सर्वाच्या प्रारंभाचा एक माहोल तयार करते. टीझरमधून दिसणाऱ्या ऋषभ शेट्टीच्या गहन पात्रात, प्रेक्षक खोलवर बुडून जातात. एक गूढ आणि षड्यंत्राने भरलेल्या वातावरणाची निर्मिती होते.
https://x.com/hombalefilms/status/1729031628637495315?s=46


https://x.com/hombalefilms/status/1729031628637495315?s=46
उल्लेखनीय बाब अशी की, गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या हृदयावर अमिट छाप उमटवणाऱ्या कर्णमधुर आणि हृदयस्पर्शी संगीतीचे या नव्या चित्रपटाच्या व्हिडिओत पुनरागमन होत आहे. टीझरचा शेवट एका अनोख्या तऱ्हेने होतो– संगीतातील सात वेगवेगळे राग, सात भाषांचे प्रतिनिधित्व करतात, ज्या भाषांमध्ये ‘कंतारा चॅप्टर १’ प्रदर्शित होणार आहे.


उल्लेखनीय बाब अशी की, गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या हृदयावर अमिट छाप उमटवणाऱ्या कर्णमधुर आणि हृदयस्पर्शी संगीतीचे या नव्या चित्रपटाच्या व्हिडिओत पुनरागमन होत आहे. टीझरचा शेवट एका अनोख्या तऱ्हेने होतो– संगीतातील सात वेगवेगळे राग, सात भाषांचे प्रतिनिधित्व करतात, ज्या भाषांमध्ये ‘कंतारा चॅप्टर १’ प्रदर्शित होणार आहे.


मानवता आणि निसर्ग यांच्यातील गुंतागुंतीच्या नातेसंबंधाचा शोध घेणार्‍या लोककथेवर आधारित असलेल्या ‘कंतारा’ चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांना भुरळ पाडत गेल्या वर्षी जागतिक स्तरावर एक तुफान निर्माण केले होते. संपूर्ण भारतात सिनेमॅटिक अनुभव देण्याच्या वचनबद्धतेकरता प्रसिद्ध असलेल्या होम्बले फिल्म्सने ‘कंतारा चॅप्टर १’ सह देवत्व पुन्हा परिभाषित करण्याचा वारसा कायम ठेवला आहे.


उल्लेखनीय कामगिरी करत, ‘होम्बले फिल्म्स’ने गेल्या वर्षी ‘केजीएफ चॅप्टर २’ आणि ‘कंतारा’ या दोन मेगा ब्लॉकबस्टर्ससह जागतिक स्तरावर तब्बल १,६०० कोटी रुपयांची कमाई करून आश्चर्यकारक यश संपादन केले. सध्या, त्यांच्या आगामी ‘सालार’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे आणि १ डिसेंबर रोजी या चित्रपटाचा ट्रेलर जारी करून वर्षाचा ब्लॉकबस्टर चित्रपट बनण्यासाठी तो सज्ज आहे.


सात भाषांमध्ये प्रेक्षकांना भुरळ पाडणारा ‘कंतारा चॅप्टर १’ हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची सिनेरसिकांना आतुरतेने प्रतीक्षा आहे. डिसेंबरच्या अखेरीस या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल. चित्रपटाच्या कलाकारांसंदर्भात अद्याप माहिती उघड करण्यात आलेली नाही, परंतु चित्रपटाच्या पहिल्यावहिल्या दृष्टिक्षेपात, विलक्षण कथा असलेल्या समांतर दुनियेचा प्रवास दाखवण्यात आला आहे. त्यामुळे भाषिक सीमा ओलांडणारा आणि जगभरातील प्रेक्षकांवर कायमस्वरूपी प्रभाव पाडण्याचे वचन देणारा, तल्लीन करणारा अनुभव प्राप्त करण्याकरता सज्ज व्हा.
दरम्यान, होम्बले फिल्म्स प्रेक्षकांना बहुप्रतिक्षित ‘सालार : पार्ट १ सीज़फायर’ या आगामी चित्रपटासह भरपूर अॅक्शन असलेल्या सफरीवर घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात उदंड ऊर्जा व सामर्थ्य असलेले प्रशांत नील आणि प्रभास पहिल्यांदा एकत्र आले आहेत. हा चित्रपट २२ डिसेंबर २०२३ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
https://youtu.be/Frp0zC4643U?si=WQvaHvWZSYzhDUR1


https://youtu.be/Frp0zC4643U?si=WQvaHvWZSYzhDUR1

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!