गायक ‘के के’चं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच के के चं निधन झालं आहे. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराच्या झटका आला. रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच त्याचं निधन झालं. तो ५४ वर्षांचा होता.
केके कोलकात्यामधील गुरुदास कॉलेजमधील नाझरुल मंचच्या कार्यक्रमामध्ये गात असतानच त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो त्याच्या हॉटेल रुममध्ये परतला. मात्र त्याची प्रकृती खालावल्यानंतर त्याला कोलकात्यामधील सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झाल्याचं सांगितलं जात आहे.
बुधवारी सकाळी त्याची पत्नी आणि मुलं कोलकात्यामध्ये दाखल होणार आहेत. मागील दोन दिवसांत केकेने कोलकात्यात दोन कॉन्सर्ट केले होते.