असं झालं चांद्रयान ३ चं यशस्वी प्रक्षेपण…
चांद्रयान २ मोहिमेच्या अपयशामुळे भावुक झालेले इस्रोचे वैज्ञानिक कोण विसरू शकेल? पण आता त्या अपयशाच्या स्मृती विसरून नव्याने चंद्रावर स्वारी करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि चांद्रयान ३ पुन्हा सज्ज झालं. आज चांद्रयान ३ श्रीहरीकोटा येथील तळावरून अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्ट रोजी ते चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे.
चंद्राचे भूगर्भशास्त्र, तिथल्या पर्यावरणाचा अभ्यास हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. श्रीहरिकोटा मधील सतीश धवन अंतराळ केंद्रातील दुसऱ्या लाँच पॅडवरून चांद्रयान-3 चे LMV-3 च्या द्वारे चंद्रावर प्रक्षेपण केले जाईल. हे यान 14 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी आपल्या चांद्रप्रवासाला सुरुवात करेल. हे चांद्रयान पृथ्वीपासून सुमारे 3,84,000 किलोमीटर दूर जाईल.
आजचं प्रक्षेपण पाहण्यासाठी इस्रोकडून अनेक शाळांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. देशातील विविध ठिकाणाहून चांद्रयान ३ चे प्रक्षेपण पाहण्यासाठी लोकांनी हजेरी लावली.