भाजपकडून श्री गणेशाचा अनादर; काँग्रेसचा आरोप
मडगाव :
देव श्रीगणेशाचा अनादर केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाचे मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना खडसावत त्यांच्या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे.
श्रीगणेश मुर्ती पायाशी ठेवून जोडे घालून उभे असलेले भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या छायाचित्रावर आक्षेप घेत काँग्रेस पक्षाने भाजपची कडक शब्दात निंदा केली आहे.
अहंकारी भाजपच्या मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांचे लाजिरवाणे कृत्य. श्रीगणेशाचा अनादर करणाऱ्या या कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. भाजप टोळीच्या अहंकाराने नवा उच्चांक गाठला आहे. या उद्धटाना कायमचा धडा शिकवण्याची वेळ आली आहे, अशी पोस्ट कॉंग्रेसने आपल्या समाज माध्यमांवर टाकली आहे.
This is the true face of Flag Bearers of 'Haram Rajya' of @BJP4India @JPNadda & @PMOIndia @narendramodi. I am deeply hurt to see these scoundrels standing wearing Shoes & keeping the Holy Idol of Ganapati Bappa at their feet. I condemn this shameful act. pic.twitter.com/m3O4TufZkD
— Amit Patkar (@amitspatkar) February 17, 2024
जे पी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या हराम राज्याच्या ध्वजवाहकांचा हा खरा चेहरा आहे. गणपती बाप्पाची पवित्र मूर्ती पायाशी ठेवून पायात बूट घालून उभे असलेले बदमाश पाहून मला खूप वाईट वाटले. या लज्जास्पद कृत्याचा मी निषेध करतो, अशी जळजळीत प्रतिक्रीया काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली आहे.
आरएसएस प्रशिक्षित भाजप मंत्री, आमदार आणि सदस्यांनी केलेल्या या लज्जास्पद कृत्याला माफी नाही. माझ्या भावना दुखावल्या आहेत. सुभाष वेलींगकर विघ्नहर्ताच्या या अनादरावर बोलणार की तोंड बंद ठेवणार? शेफाली वैद्य आणि गिरीराज पै वेर्णेकर हे भाजपचे लाऊडस्पीकर कुठे आहेत, असा सवाल काँग्रेसचे सोशल मीडिया प्रभारी दिव्या कुमार यांनी केला आहे.