google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

GMC नोट: मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याची मागणी

पणजी :

जीएमसीच्या वादग्रस्त नोटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्याकडून स्पष्टीकरण मागवावे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुपर स्पेशालिटी ब्लॉकचे नोडल अधिकारी डॉ. उदय काकोडकर यांनी गोवा मेडिकल कॉलेज इस्पितळाच्या कर्मचाऱ्यांना जीएमसी बाहेरील विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ खरेदी करू नयेत असे निर्देश देणाऱ्या 16 फेब्रुवारी 2024 च्या अधिकृत नोटची चौकशी करावी. काँग्रेस पक्षाने प्रधानमंत्र्यांना  टॅग केल्यानंतर 24 तासांच्या आत सदर सुचनापत्र मागे घेण्याची कारणे शोधणे गरजेची आहेत अशी मागणी काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केली.

गोवा मेडिकल कॉलेजमध्ये आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी नियुक्त केलेल्या खासगी केटरिंग कंत्राटदारांच्या  व्यवसायाला चालना देण्यासाठी ही नोट जारी करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.

सांताक्रूझ गट कॉ्ग्रेस अध्यक्ष जॉन नाझारेथ आणि सांतआंद्रे गट अध्यक्ष मनोज पालकर यांच्यासमवेत आज काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेला संबोधित करताना, काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी अन्न व औषध प्रशासनाने गेल्या तीन महिन्यात जीएमसी बाहेरील सर्व फूड स्टॉल्सच्या केलेल्या तपासणीचे अहवाल सार्वजनिक करावेत अशी मागणी केली.


एक प्रकारे डॉ. उदय काकोडकर यांनी राज्यातील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा पर्दाफाश करून सर्वात भ्रष्ट आरोग्यमंत्री डॉ. विश्वजित राणे यांना उघडे पाडले आहे, असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.

जीएमसीच्या सुपर स्पेशलिटी ब्लॉकचे नोडल ऑफिसर डॉ. उदय काकोडकर यांना रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरत असल्यास त्यांच्यावर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यास  कोणी रोखले होते? असा सवाल अमरनाथ पणजीकर यांनी विचारला.

जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे ही जीएमसीच्या नोडल ऑफिसरची जबाबदारी नाही का? त्यांना सामान्य लोकांचे पडून गेले नाही का? त्यांनी जारी केलेली नोट आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे बाहुले बनलेल्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या नोडल ऑफिसरची असंवेदनशीलता आणि पाषाणी काळजाची वृत्ती दर्शवते, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एक घोटाळा आहे. गेल्या वर्षी काँग्रेस पक्षाने पाण्याचे टँकर सांडपाण्याचे पाणी कसे वाहून नेत होते याचा पर्दाफाश केला होता आणि एफडीएला त्याबद्दल काहीच माहिती नव्हती. आता, जीएमसी नोडल ऑफिसर म्हणतात की खाद्यपदार्थ बनविणारे स्टॉल सांडपाणी वापरतात. यावरून एफडीए पूर्णपणे कोलमडल्याचे  दिसून येते, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!