google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

“तिरंगा जागृती” करण्यापूर्वी तिरंगा कसा धरायचा हे शिकण्याची गरज’

पणजी :

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतरांसह भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा कसा अपमान केला आहे, हे समाज माध्यमांवर उपलब्ध अनेक चित्रफितीतून समोर आले आहे. ११ आणि १२ ऑगस्ट रोजी तिरंगा जागृती करण्यापूर्वी भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी तिरंगा कसा धरायचा हे शिकून घ्यावे, असा सणसणीत टोला काँग्रेसचे माध्यम विभाग अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी हाणला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी काल जाहीर केलेल्या दोन दिवसीय “तिरंगा जागृती” कार्यक्रमावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, अमरनाथ पणजीकर यांनी भाजपच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा केलेला अनादर दाखवणारा व्हिडिओ उघड केला. ते म्हणाले की, भाजपचे कार्यकर्ते आता देशाचा राष्ट्रध्वज वापरून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी राज्यपाल वजुभाई वाला राष्ट्रगीत वाजत असताना तेथून निघून जात असल्याचे व्हिडिओंमध्ये दिसत आहे. एका व्हिडिओमध्ये गृहमंत्री अमित शहा तिरंगा खाली खेचताना आणि इतर भाजप कार्यकर्ते निर्लज्जपणे टाळ्या वाजवताना दिसत आहेत. दुसर्‍या एका व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील भाजप आमदार अवधेश सिंह यांनी तिरंगा उलटा लावला आहे, असे अमरनाथ पणजीकर यांनी स्पष्ट केले.

गरीब लोकांना त्यांचे मासिक रेशन घेताना तिरंगा खरेदी करण्यास भाग पाडले जाते हे दाखवणारा भाजपचेच नेते वरुण गांधी यांनी समाजमाध्यमांवर टाकलेला व्हिडीओ धक्कादायक असुन,खोटी देशभक्ती आणि जुमला राष्ट्रवाद दाखवून राजकीय फायदा मिळवण्यासाठी भाजप सरकार आणि पक्षाचे पदाधिकारी दादागिरी करत आहेत, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

गोवा भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी कालच तिरंगा उलटा दाखवून राष्टट्रध्वजाचा अपमान केला. “तिरंगा जागृती” या त्यांच्या राजकीय मिशनवर जाण्यापूर्वी राष्ट्रध्वजाचा आदर कसा करायचा याचे धडे भाजप अध्यक्षांनी घेण्याचे आवाहन अमरनाथ पणजीकर यांनी केले आहे.

हर घर स्वच्छ पाणी, हर घर अखंड वीज, हर घर नोकरी, हर घर वेळेवर गरजूनां आर्थिक सहाय्य, हर घर आरोग्य सेवा, हर घर इंटरनेट कनेक्शन, हर घर शिक्षण, हर सरकारी विभागात शून्य भ्रष्टाचार, यावर लक्ष देणे जास्त गरजेचे आहे. ‘हर घर तिरंगा’ हे भाजपचे मिशन म्हणजे केवळ प्रसिद्धी स्टंट आहे, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!